द्राक्षबाग काढून लावले सीताफळ, चौथ्याच वर्षी दहा एकरात घेतले 56 लाखाचे उत्पन्न
खामगावच्या राजेंद्र ठोंबरे यांच्या सिताफळाची किमया
बार्शी: शेती ही निसर्गावर अवलंबून आहे ,त्यामुळे शेतात कोणतेही पिक असले तरी प्रत्यक्षात उत्पन्न हातात आल्याशिवाय कांही खरे नाही, मात्र जिद्द, चिकाटी व योग्य नियोजन करुन शेती केल्यास ती तोट्याची नव्हे तर व्यापारापेक्षाही चांगला नफा देऊन जाते हे खामगाव (ता बार्शी) येथील तरुण शेतकरी राजेंद्र रावसाहेब ठोंबर व त्यांचे उद्योजक बंधू संतोष ठोंबरे यांनी चौथ्या वर्षीच्या सिताफळाच्या बागेतून दहा एकरात विक्रमी ५६ लाखाचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे.

बार्शी तालुक्यातील खामगाव हे तसे शेतीप्रिय असलेले व सधन गाव़ या गावात पुर्वीपासून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते़ शेतकरी कांद्याचे विक्रमी पिक घेतात़ त्यामुळे त्यांना शेतीतील प्रयोग हे काही नवीन नाहीत़ राजेंद्र ठोंबरे यांना अठरा एकर जमीन असून यामध्ये ते पुर्वी पासून ऊस, ज्वारी, हरभरा, कांदा अशी पिके घेत होते़ तसेच त्यांची दोन एकर द्राक्ष बाग ही होती़ मात्र त्यातून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते.

म्हणून ठोंबरे यांनी सिताफळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला़ ते लावण्यासाठी चांगली असलेली द्राक्षाची बाग मोडून टाकली़ त्यानंतर महिन्यात अडीच बाय अडीच फुटाचे खड्डे घेऊन त्यात गावखत व सुपर फॉस्पेट टाकून जूनमध्ये पाऊस पडल्यावर जून २०१५ ला सुपर गोल्डन या सिताफळाच्या जातीची आठ बाय सोळा अंतरावर लागवड केली़ बागेच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर आहेत तर फवारणीसाठी ब्लोअर ही आहेत.

लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी सिताफळाची झाडे छोटी असल्याने हरभऱ्याचे अंतरपिक घेतले़ त्याचेही चांगले उत्पन्न मिळाले़ जुन्या पिकाचे ड्रिप असल्याने त्याचाच वापर केला़ लागवड केल्यानंतर २०१७ ला ३० महिन्यात झाडांना चांगला माल लागला़ एका झाडाला साधारणपेण पस्तीसच्या जवळपास फळे लागली.
एकरी सर्वसाधारणपणे सव्वा टन उत्पन्न मिळाले़ दिडशे रुपये किलो दर मिळाल्याने पहिल्या वर्षी लागवडीपासून ते काढणीपर्यंत झालेला सत्तर हजार रुपये खर्च वजा करुन एकरी एक लाख ऐंशी हजार रुपये निव्वळ नफा मिळाला़ सिताफळाच्या बागेवर मिलीबग, फळमाशी, आदी किडीचा प्रार्दूभाव होऊ नये यासाठी त्यांनी सोलरवर चालणारे ट्रॅप ही बसवले आहेत. तर फळमाशांसाठी गंध सापळे लावलेत
चार देशी गायी , त्यांचे शेण गोमुत्र साठविण्यासाठी स्वतंत्र हौद असून कंपोस्ट खतासासाठी ही स्वतंत्र हौद आहे़ बागेला आठ ते दहा दिवसांनी ते जीवामृतचा डोस देतात.

एकरी चार लाखाचे उत्पन्न
पहिल्याच वर्षी चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे ठोंबरे यांचा आत्मविश्वास वाढला़ यावर्षी ही त्यांनी या सिताफळाच्या बागेची आणखी निगा राखली़ यावर्षी प्रत्येक झाडाला सरासरी सत्तर पेक्षा जास्त फळे लागली असून ही फळे आकाराने मोठी आहेत़ बहुतांश फळे ही एक किलोपेक्षा मोठी असून चार फळाचा एक बॉक्स करुन तसेच निवड करुन त्याची विक्री केली जाते.


बाग लावल्यानंतर तिसर्या वर्षी 2018 साली खर्च वजा करुन सरासरी दिडशे रुपये दर मिळाला आहे़ दिल्ली, बैंगलोर, हैद्राबाद, नवीमुंबई आदी ठिकाणी हा माल विक्रीसाठी ठोंबरे पाठवत आहेत़ यासाठी शेतामध्ये दहा माणसे राबत आहेत़ यावर्षी छाटणीपासून ते माल विक्रीहोईपर्यंतचा एकरी साधारपणे माणसांचा खर्च धरला तरी पन्नास हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी एकरी तीन टनाचे उत्पन्न निघाले असून खर्च जाऊन एकरी चार लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर २०१९ मध्ये याच दहा एकरमध्ये विक्रमी ५६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. या वर्षी बहुतांश माल हा दिल्ली व दक्षिणेकडील राज्यात विक्रीसाठी पाठविला.
विषेश म्हणजे या बागेवर कोणत्याही प्रकारच्या हानिकारक औषधांची फवारणी नसल्यामुळे रेस्युड्यु फ्री म्हणून प्रमाणपत्र ही मिळालेले आहे़ विशेष म्हणजे ग्राहकांना त्याची खात्री पटावी यासाठी बॉक्सवर क्युआर कोड दिला असून तो स्कॅन केल्यास ते प्रमाणपत्र ही पहावयास मिळत आहे़
यंदा १८० रुपये दर, उन्हाळ्यात पाणीच लागत नाही

यावर्षी १८० रुपये किलो असा उच्चांकी दर मिळाला आहे़ तर मध्यम व लहान फळाला १०० रुपये दर मिळत आहे़. ऑक्टोबरमध्ये सुरु झालेला माल हा डिसेंबर अखेरला संपतो़ या व्हरायटीची टिकवण क्षमता ही जास्त असून तोडणीनंतर आठ दिवस हे सिताफळ उत्तमपध्दतीने राहू शकते.
तसेच ज्या काळात पाण्याची टंचाई भासते त्या काळात म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीत सिताफळाला पाणी लागत नाही त्यामुळे अत्यल्प पाण्यावर मोठे उत्पन्न देणारे पिक म्हणून सिताफळ पुढे येत असल्याचे राजेंद्र ठोंबरे यांनी सांगीतले.

पॅकिंग व ब्रँडीग
ठोंबरे हे केवळ विक्रमी उत्पन्न घेऊनच थांबले नाहीत तर या पिकवलेल्या सिताफळाचा चांगल्या भावाची बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशिल होते़ त्यानूसार त्यांनी ठोंबरे फार्म अँड नर्सरी हा स्पेशल ब्रँड तयार करुन घेतला़ दोन, चार, सहा अशा नगाचे बॉक्स बनवून घेतले तसेच कांही गरजेनूसार विस किलो वजनाचे मोठे बॉक्स देखील तयार करुन त्याद्वारे पँकीग करुन ताजा व उच्च दर्जाचा माल ते विक्रीसाठी पाठवत आहेत.

राजेंद्र ठोंबरे यांनी केवळ सीताफळ उत्पादनावरच न थांबता खामगाव येथे ४ एकर क्षेत्रावर भव्य अशी ‘सुपर गोल्डन’ जातीची सीताफळ नर्सरी सुरु केली आहे या ठिकाणी उच्च प्रतीची खात्रीशीर रोपे उपलब्ध आहेत. या सीताफळ रोपांना राज्यासह देशभरातून मोठी मागणी आहे . आपणास सीताफळ लागवड करावयाची असल्यास आपणही खात्रीशीर रोपांसाठी खालील नंबरवर संपर्क करू शकता.

राजेंद्र ठोंबरे : 9673606387,9146185959
www.thombarenursery.com
www.custardapplenursery.com
www.sitaphalnursery.com
https://www.facebook.com/Thombare-Farm-Nursery-250431945859083