देशात 24 तासांत 1,334 नवीन कोरोना रुग्ण, एकूण रुग्ण संख्या झाली 15,712

0
382

ग्लोबल न्यूज – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन 1,334 केसस समोर आल्या असून 27 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना प्रकरणे 15,712 आणि मृत्यू 507 झाले आहेत. मागील 28 दिवसांत पुडुचेरी येथील माहे आणि कर्नाटक येथील कोडागू येथे कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल म्हणाले की, गेल्या 14 दिवसांत 23 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 54 जिल्ह्यांमध्ये कोणत्याही कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. देशात आतापर्यंत कोरोनाचे 2,231 रूग्ण बरे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. देशात 755 कोरोना समर्पित रुग्णालये आणि 1,389 समर्पित आरोग्य सेवा केंद्रे आहेत, ज्याठिकाणी एकूण 2,144 गंभीर व संबंधित रूग्णांवर उपचार करता येतील.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जगभरातील ऐतिहासिक आकडेवारीवरून असे दिसून येते की असिम्प्टोमॅटिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची टक्केवारी मोठी नाही. या आव्हानाविषयी आपण जागरूक असणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. जास्त जोखीम असणाऱ्या असिम्प्टोमॅटिक व्यक्ती नमुन्यांच्या निकषाचा भाग आहेत, असे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

आयसीएमआरचे डाॅ. रमण गंगाखेडकर म्हणाले की, आम्ही आतापर्यंत 3,86,791 चाचण्या केल्या आहेत. काल 37,173 चाचण्या घेण्यात आल्या, यापैकी 29,287 चाचण्या आयसीएमआर नेटवर्कच्या प्रयोगशाळांमध्ये घेण्यात आल्या तर खासगी क्षेत्रातील लॅबमध्ये 7886 चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान गोवा राज्यामधील शेवटचा कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे गोवा राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

आज (रविवारी) एक हाय लेवल टास्क फोर्सचे गठन करण्यात आले असून ही फोर्स कोरोनावरील लस व संबंधित संशोधनाला चालना देण्यासाठी काम करेल. दरम्यान 20 एप्रिलपासून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही उद्योगधंद्यांना सूट देण्यात येणार असून त्यांच्यासाठी संचारबंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल केले जाणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur