देशात सर्वाधिक मृत्युदर सोलापुरात: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.26 टक्के तर मृत्युदर 3.32 टक्के;वाचा सविस्तर-

0
297

देशात सर्वाधिक मृत्युदर सोलापुरात: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31.26 टक्के तर मृत्युदर 3.32 टक्के;वाचा सविस्तर-

मुंबई – राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2,598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, आज राज्यात 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यात आतापर्यंत 1,982 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 698 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 31.26 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.तर राज्यात सर्वाधिक मृत्युदर हा सोलापुरात 9.62 टक्के आहे.

आज झालेल्या 85 मृत्यूपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 15 ते 25 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 48 मृत्यूपैकी मुंबई 22, सोलापूर 5, अकोला 4, औरंगाबाद 3, सातारा 3, ठाणे 3, वसई विरार 3, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे, रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 60 पुरुष तर 25 महिला आहेत. त्यातील 45 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 9 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 45 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 59,546  (मृत्यू – 1982)
मुंबई महानगरपालिका- 35, 485 (मृत्यू 1135)
ठाणे- 537 (मृत्यू 6)
ठाणे महानगरपालिका- 3226 (मृत्यू 71)
नवी मुंबई मनपा- 2390 (मृत्यू 41)
कल्याण डोंबिवली- 1129 (मृत्यू18)
उल्हासनगर मनपा – 241 (मृत्यू 6)
भिवंडी, निजामपूर – 107 (मृत्यू 3)
मिरा-भाईंदर- 590 (मृत्यू 10)
पालघर- 129 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 696 (मृत्यू 20)
रायगड- 520 (मृत्यू 13)
पनवेल- 424 (मृत्यू 13)
नाशिक – 147
नाशिक मनपा- 174 (मृत्यू 5)
मालेगाव मनपा – 722 (मृत्यू 47)
अहमदनगर- 71(मृत्यू 6)
अहमदनगर मनपा – 21
धुळे – 29 (मृत्यू 3)
धुळे मनपा – 100 (मृत्यू 6)
जळगाव- 385(मृत्यू 47)
जळगाव मनपा- 141 (मृत्यू 5)

नंदुरबार – 32 (मृत्यू 3)
पुणे- 457 (मृत्यू 8)
पुणे मनपा- 6050 (मृत्यू 286)
पिंपरी-चिंचवड मनपा- 389 (मृत्यू 7)
सातारा- 429 (मृत्यू 16)
सोलापूर- 31 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 680 (मृत्यू 57)
कोल्हापूर- 322 (मृत्यू 1)
कोल्हापूर मनपा- 29
सांगली- 90

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 11 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 19
रत्नागिरी- 204 (मृत्यू 5)
औरंगाबाद – 29 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा – 1341 (मृत्यू 59)
जालना- 87
हिंगोली- 143
परभणी- 32 (मृत्यू 1)
परभणी मनपा-80
लातूर -98 (मृत्यू 3)
लातूर मनपा- 9
उस्मानाबाद-54
बीड – 41

नांदेड – 22
नांदेड मनपा – 86 (मृत्यू 6)
अकोला – 42 (मृत्यू 5)
अकोला मनपा- 487 (मृत्यू 23)
अमरावती- 16 (मृत्यू 2)
अमरावती मनपा- 181 (मृत्यू 12)
यवतमाळ- 116
बुलढाणा – 55 (मृत्यू 3)
वाशिम – 8
नागपूर- 10
नागपूर मनपा – 485 (मृत्यू 9)

वर्धा – 11 (मृत्यू 1)
भंडारा – 20
चंद्रपूर -16
चंद्रपूर मनपा – 9
गोंदिया – 51
गडचिरोली- 28

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2816 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 17,211 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 65.61 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur