देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची पाच हजारकडे वाटचाल, तर राज्यात हजाराचा आकडा पार

0
283

मुंबई | भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4 हजार 789 वर पोहचली असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दर तासाला वाढ होतांना दिसून येत आहे. आज देशात 508 नवीन रुग्ण रुग्ण आढळून आले आहे तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसेच आतापर्यंत या आजारातून 353 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 124 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आज राज्यात दिवसभरात 150 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता 1018 वर पोहचला आहे. राज्यातील आजच्या 150 रुग्णांपैकी 100 रुग्ण एकट्या मुंबईतले आहे. मुंबईत कोरोना आतापर्यंत 590 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 40 जण आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-

Best IT Comany In Maharashtra , Solapur