देवेंद्र भौ आमचे चुकलेच !! शिवसेनेचा फडणवीसांना टोला

0
265

देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!
उद्धव ठाकरे सतत महाराष्ट्रातील जनतेची काळजी वाहतायत त्यांची जबाबदारी घेतायत !! कोविड सेंटर उभारून रुग्णांचे प्राण वाचवतायत !!भाजपच्या नेत्यांसारखे टाळ्या , थाळ्या वाजवायला आणि दिवे लावून चमकायला सांगत नाहीत !!
म्हणून देवेंद्र भौ आमचे चुकलेच !! असे म्हणत शिवसेना प्रवक्ता डॉ मनीषा कायंदे यांनि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

खरच देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!! आम्ही टाळ्या , थाळ्या वाजवल्या नाहीत , बेडूक उड्या , कोलांट उड्या मारल्या नाहीत , दिवे घालवून दिवे जाळले नाहीत , वारंवार
भाजपा ल सॉरी राज्यपाल यांच्याकडे गेलो नाही
देवेंद्र भौ आमचे खरच चुकले !!!!

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्या ऐवजी उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून कोरोनातून लोकाना वाचवण्यासाठी कठोर झाले , त्यानी हजारो बेडस ची व्यवस्था केली , कोविड सेंटर उघडली , 10 रुपयांची शिवभोजन थाळी 5 रूपयात तर अनेक ठिकाणी मोफत दिली , रेल्वेने मजूराना घरपोच पाठवले , पाच लाख मजूरांची तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली , खरच देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!!

आम्ही राजकरण करू शकलो नाही देवेंद्र भौ कारण आमचे नेते उद्धव ठाकरे आहेत जे कामातून बोलतात , टाळ्या आणि थाळ्या वाजवून नाचायला आणि दिवे घालवून दिवे जाळायला सांगत नाहीत म्हणून देवेंद्र भौ आमचे चुकलेच !! असा टोला शिवसेना प्रवक्ता डॉ मनीषा कायंदे यानी देवेंद्र फडणवीस याना लगावत भाजपच्या आंदोलनाचा आणि नौटंकीचा पर्दाफाश केला.

खरच देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!! गेले दोन महीने मार्च महिन्याच्या 14 तारखेपासून ते अगदी आज पर्यंत सतत दिवसरात्र महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी घेऊन काळजी वाहणारा , त्याना कोरोनाच्या मृत्युच्या जबड्यातून वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करणारा , जनतेला घरी रहा आणि खबरदारी घ्या मी तुमची जबाबदारी घेतो म्हणणारा अत्यंत धोरणी आणि धडाकेबाज मुख्यमंत्री फ़क्त महाराष्ट्रातील नव्हे देशातील , जगातील जनता अनुभवते आहे, उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्वाचे कौतुक तुमच्या केंद्रीय नेत्यांना सुद्धा आहे , खरच देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!!

अवघ्या महिन्याभराच्या आत हजारो रुग्णांची व्यवस्था करणारे कोविड सेंटर मुंबईच्या प्रमुख भागात उभे करुन हजारो रुग्णांची व्यवस्था आधीच करुन ठेवणे , इतर राज्यातील मजूराना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी दररोज 20/30 रेल्वे गाड्या , बस गाड्या , एसटी , ट्रक , खाजगी वाहने यांची व्यवस्था करुन त्याना सुखरूप आपल्या घरी पोहचवणे , कोरोना योध्ये डॉक्टर, नर्स ,वॉर्डबॉय ,पोलिस , सफाई कामगार , बँकेतील कर्मचारी , जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठादार , दूध , भाज्या , फळे आदि गोष्टी सर्वसमान्यांपर्यंत पोहचवणारे श्रमजीवी , शेतात राबणारे शेतकरी , कष्टकरी , आदिवासी अशा अनेकांशी सतत संपर्कात राहून त्याना धीर देण्याचे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री स्वतः करत आहेत .

खरच देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!!

हे सोडून त्यांनीही आम्हाला टाळ्या वाजवा , थाळ्या वाजवा , दिवे घालवा , दिवे जाळा , कोलंट उद्या मारा , माकड उड्या मारा , काळा रंग फासा , काळा फलक घेवून बोंबलत सुटा हे करायला सांगितले नाही , खरच देवेंद्र भौ आमचे चुकलेच !!! असेही उपहासाने म्हणात त्यानी भाजपच्या दुट्टपी धोरणाचा पर्दाफाश केला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur