दुःखदायक:कोरोनामुळे जगात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात ७६०० कोरोना बाधित रुग्ण

0
350

मुंबई: कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे २०९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण १०२,७३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे. यात चीन, इटली, स्पेन, अमेरिका, ब्रिटन आणि इराणमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासात २००० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इथे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.तर भारतात आतापर्यंत कोरोनामुळे २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. 


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मिळालेल्या माहितीनुसार अंटार्टिका सोडता इतर सर्व खंडातील २०९ देशात या व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे १,६९९,६३२ जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण १०२,७३४ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सुमारे ३,७६,३३० जण यातून बरे झाले आहेत. आजही जगभरात एकूण १,२२०,५६८ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यातील ४९,८३० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 


आतापर्यंत १०,५५,०६९ केसेस पॉझिटीव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर ४ लाख २६ हजार ७०३ केसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यात बरे झालेले रुग्ण आणि मृत पावलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

 

इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू 

चीनमधून या आजाराचा फैलाव झाला असला तरी आता इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये या व्हायरसने सर्वाधिक थैमान घातले आहे. इटलीमध्ये गेल्या २४ तास ७४७ जण दगावल्याने या देशात मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या १८,८४९ झाली आहे. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे.  अमेरिकेत गेल्या २४ तासात २००० जण दगावल्याने या देशात मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या १८,७४७ आहे. तर स्पेन हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये १६,०८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह अमेरिकेत 

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आहे. अमेरिकेत एकूण ५,०२,८७६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर स्पेन असून या ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या १,५८,२७३ आहे.  तर तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या १,४७,५७७ आहे. 

जगात सर्वाधिक मृत्यू संख्या असलेले देश 

इटली – १८,८४९ 

अमेरिका – १८,७४७ 

स्पेन –  १६,०८१

फ्रान्स – १०८६९

ब्रिटन – ८९५८

इराण – ४२३२

चीन – ३३३९

जर्मनी -२७३६

नेदरलँड – २५११

बेल्जियम -३०१९


भारताची सद्यस्थिती 

भारतात ३२ राज्यात एकूण ७६०० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या २४ तासात ५६५ नवे रुग्ण देशात आढळले आहेत. त्यातील सध्याच्या घडीला ६५७७ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. भारतात एकूण ७७४ जण या आजारातून बरे झाले आहेत. एकूण २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जगाची आकडेवारीवर नजर 

देश -२०९

कोरोना बाधित – १,६९९,६३२

मृत्यू – १०२,७३४

बरे झालेले रुग्ण –  ३,७६,३३०

सध्या बाधित संख्या – १,२२०,५६८ 

अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण –  ४९,८३०भारताची आकडेवारी 

राज्य – ३२ 

कोरोना बाधित – ७६०० 

मृत्यू – २४९

बरे झालेले रुग्ण –  ७७४ 

सध्या बाधित संख्या – ६५७७    

अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण –  ०

Best IT Comany In Maharashtra , Solapur