दादा आपण कोल्हापुरातून का लढला नाही, खडसेंचा सवाल
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: विधानपरिषदेच्या जागेवरून एकनाथ खडसे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यात चांगलीच जपलेली दिसून येत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच शब्दीक चकमक पाहायला मिळत आहे.

खडसेंना पक्षानं किती द्यायचं* असा सवाल खडा करत पाटील यांना खडसेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा भाजपाशी फक्त चार वर्षांचा संबंध आहे. ते स्वत:ला इतके मोठे नेते मानत असतील तर कोल्हापुरातून निवडणूक का लढली नाही,’ असा सवाल उपस्थित करत खडसेंनी पाटलांना जोरदार टोला हाणला आहे.

एका मुलाखतीत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सर्व आरोपांना उत्तरं दिली. ‘मला तिकीट नाकारण्याशी घराणेशाहीचा अजिबात संबंध नाही. माझ्या मुलीसाठी मी कधीही तिकीट मागितलं नव्हतं. माझं तिकीट कापून बळजबरीनं ते मुलीला दिलं गेलं.
माझ्या कुटुंबात केवळ एक जण खासदार आहे. कालपर्यंत मी निवडून यायचो. या पलीकडं तिसरं कोण आहे, असा सवाल त्यांनी केला. सहकार क्षेत्रातील जी पदं आमच्याकडं आहेत त्याचा पक्षाशी संबंध नाही आणि तरीही घराणेशाहीचा निकष लावायचा झाला तर भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे सध्या मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पितापुत्र आमदार-खासदार आहेत,’ याची आठवणही त्यांनी दिली.