‘दाऊद’ला संपवायला निघालेली ती ‘बेगम’ कोण होती?
‘अंडरवर्ल्ड’ हा शब्द ऐकताच ऐंशीच्या दशकातील मुंबईच्या गुन्हेगारीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. बॉलिवूडमध्ये या गुन्हेगारीवर आधारित अनेक चित्रपट देखील येऊन गेले आहेत. मुबंई सारख्या मायानगरीवर अनेक गुन्हेगार आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ करत होते. यासाठी अंमली पदार्थांची मोठया प्रमाणात तस्करी, खून, दरोडे, दहशत आदींचा वापर केला जात होता.

परंतु त्या काळात या अंमली पदार्थांच्या तस्करीला झहीर (अंकित मोहन) याचा विरोध होता. हाच विरोध करत असताना त्याच्याकडून चुकून कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन मकसुदच्या (अजय गेही) टोळीतील नाना म्हात्रेचा (राजेंद्र शिसतकर) भाऊ मारला जातो. त्यामुळे मकसुदच्या इशाऱ्यावर नाना म्हात्रे आणि त्याच्या टोळीतील गुंडांकडून झहीरचा खून करण्यात येतो. त्यानंतर झहीरची पत्नी अशरफ भाटकर उर्फ सपना (अनुजा साठे) तुटलेल्या संसारातून बाहेर पडून त्यांचा बदला कसा घेते हा थरारक अनुभव घेण्यासाठी सचिन दरेकर यांनी दिग्दर्शित केलेली ‘एक थी बेगम’ ही वेब सिरीज पहावी लागेल.
‘एक थी बेगम’ ही वेब सिरीज १४ भागाची असून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येणार आहे. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी अश्या दोन भाषेत ही वेब सिरीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सिरीजची खासियत अशी आहे की यात दोन मधुर संगीत असलेली गाणी आहेत. ‘रब क्यूं खफा’ आणि ‘चुभती है तन्हाईया’ ही गीते असून ते सुनिधी चौहान आणि जावेद अली या प्रसिद्ध गायकांनी गायली आहेत. अशरफ भाटकर उर्फ सपना (अनुजा साठे) पतीचा बदला घेण्यासाठी दृढ निश्चय करते परंतु गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडांना मारणे तेवढे सोपे नसते त्यासाठी तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

हा सामना करत असताना तिच्यातील अभिनय क्षमता लक्ष्यात येत. अत्यंत ताक्तीची कलावंत असून तिने अशरफ भाटकर या कॅरेक्टरला न्याय दिला आहे. झहीर (अंकित मोहन) ने उत्तम अभिनय केला असून प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. या वेब सिरीजमध्ये सर्वात जास्त लक्षात राहणारे पात्र म्हणजे पोलीस अधिकारी तावडे (अभिजीत चव्हाण). अभिनयाचं अचूक टायमिंग असल्यामुळे अत्यंत भ्रष्ट पोलीस अधिकारी करताना आपल्याला खरच तावडेची चीड यायायला लागते, हीच त्यांच्या अभिनयाची पावती असल्याचे ठळकपणे जाणवते.

एकीकडे याच तावडेला ज्युनियर पोलीस अधिकारीच्या भूमिकेत (चिन्मय मांडलेकर) टक्कर देताना दिसतात अत्यंत नम्र अधिकारी चांगल्या पद्धतीने वाटवण्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रामाणिक अधिकारी असावा तर असा हे वाक्य आपोआपच प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळते. सावत्या (संतोष जुवेकर) नेहमी नशेत असणारा आणि स्त्री लंपट भूमिका भाव खाऊन जाते. नाना म्हात्रे (राजेंद्र शिसतकर)ची भाईगिरी वेळोवेळी दिसून येते.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन मकसुदचे पात्र अजय गेही यांनी पार पाडताना आवाजातील लकब वापरण्यात ते यशस्वी झाले आहेत. वेब सिरीजमधील नायक आणि नायिकेला आधार देणारे तिसरे पात्र म्हणजे इक्बाल ही भूमिका विठ्ठल काळे यांनी वठवली आहे. यात एकाला मारताना ‘ये सुलू पोट्या बुढा हो गया बे तू, तेरे दम से अब बच्चा भी नही मुतेगा’ हा डायलॉग लक्षात राहतो. वास्तववादी अभिनय केल्यामुळे इक्बालची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते.
‘सावत्या की रेशमा’ हा डायलॉग लक्षात राहतो. सावत्या आपल्यापासून दूर जाईल या इर्षेने सपनाचा तिरस्कार (अपूर्वा चौधरी)ने चांगल्या प्रकारे पार पडला आहे. डॅडीची भूमिका
(विजय निकम) यांनी साकारली असून डॅडीची असलेली दहशत हुबेहूब साकारली आहे.
कोणत्याही घटनेत पत्रकार किती महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते, गुन्हेगारीची समीकरणे कशी बदलते याची भूमिका पार पडताना रेशम श्रीवर्धनकर यांनी अस्सल पत्रकार उभा केला आहे. प्रदिप डोईफोडे, राजू आठवले, नाझर खान, अनिल नगरकर, सुचित जाधव आदींनी ही चांगल्या प्रकारे भूमिका साकारल्यामुळे त्याही आपल्या लक्षात राहतात.

मराठी चित्रपट क्षेत्रात पहिल्यांदाच दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी अंडरवर्ल्ड दुनियेतील सत्य घटनेवर ही वेब सिरीज साकारली असून अतिशय उत्तम कलाकृती झाली आहे. ही सिरीज सत्यात उतरवण्यासाठी दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी त्या काळातील अनेक व्यक्तींना भेटी दिल्या देऊन त्याचा सखोल अभ्यास केला आहे. यावरून आपल्याला वेब सिरीजची वाढत असलेली प्रसिध्दी लक्षात येते. दरेकर यांनी 80 च्या दशकातील सर्वांच्या वेशभूषा, परिसर, इमारती, गाड्या आदींचा समावेश चांगल्या पद्धतीने उभा केला असून बॅकग्राऊंडचे संगीत, प्रकाशयोजना या आपल्याला त्याच काळात घेऊन जातात. सध्या ही सिरीज लाखो प्रेक्षकांनी पहिली असून त्याची दिवसेंदिवस संख्या वाढताना दिसत आहे. तरी सर्वांनी ही सिरीज नक्की पाहावी.
- शरणू जवळगी
9011122680