दगडी चाळीत पार पडला अरूण गवळी यांच्या मुलीचा विवाह सोहळा
ग्लोबल न्युज: अरूण गवळी याच्या मुलीचा आज अतिशय साध्यापद्धतीने अभिनेता अक्षय वाघमारे सोबत विवाह सोहळा पार पडला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून दगडी चाळीत हे लग्न संपन्न झाले.

लॉकडाऊनमुळे सगळीकडेच बंदी आहे. अखेर मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेतल्यानंतर मुंबईतील दगडी चाळीत योगिता गवळी आणि अक्षय वाघमारे आज विवाहबंधनात अडकले.
हा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आला. डिसेंबरमध्ये साखरपुडा झालेल्या या दोघांच लग्न 29 मार्च रोजी मुंबईतील लोअर परेल परिसरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम एकत्रच पार पडला. अभिनेता अक्षय वाघमारेची आई-वडिल या लग्नासाठी पुण्याहून मुंबईत आले. अतिशय साधेपद्धतीने हा सोहला पार पडला..



काल संध्याकाळी दोघांना हळद लागली. रीतीप्रमाणे नवरदेव अक्षय वाघमारेने हातावर मेहंदी लावली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.
लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याची माहिती आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी होती.

अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे.
डॉन अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते
