थंडी आणि फणफणनारा ताप ; एका ट्विटवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून रुग्णाला मदत…!

0
483

एका ट्विटवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून रुग्णाला मदत…!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील तीन महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ज्यांना आपला पक्का निवारा होता अशा लोकांची प्रचंड गैरसोय होऊन हाल होताना दिसत आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक पटीने फूटपाथवर आसरा घेणाऱ्यांच्या हालअपेष्टा झाल्याचं पाहायला मिळालं. आताही मुंबईत असेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अंधेरीतील आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ दीड महिन्यापासून पायाला गँगरीन आणि थंडी-ताप अशा अवस्थेत एक रुग्ण पडून होता. या रुग्णांची माहिती एका सजग मुंबईकराने ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्परतेने 20 मिनिटातच केलेल्या वैद्यकीय मदतीमुळे या रुग्णाचा जीव वाचला आहे.

जयदेव पांचाळ असे या रुग्णाचं नाव आहे. ते आजारी अवस्थेत आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या परिसरात रस्त्यावरच झोपून दिवस काढत होते. तेथून जाणाऱ्या एका सजग मुंबईकराच्या ही गोष्ट लक्षात आली. यानंतर या संबंधित महिलेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करुन या रुग्णाला मदत करावी असे ट्विट केले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ या ट्विटची दखल घेत कोणताही विलंब न करता या रुग्णाला मदतीसाठी आपले विश्वासू सहकारी राहुल कनाल यांना सांगितले. अवघ्या 20 ते 25 मिनिटात राहुल कनाल आणि युवासेनेच्या टीमने रुग्णवाहिका घेऊन रुग्णला मदत केली.

रुग्णाची अवस्था प्रचंड गंभीर होती. या रुग्णाच्या उजव्या पायाला जखम होती आणि त्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्याचं गँगरीन तयार झालं होतं. त्यामुळे रुग्ण थंडी आणि तापाने फणफणत होता. हे लक्षात येताच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णाला तात्काळ उपचार करण्यासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या सहकार्याने त्यांना तातडीने उपचार सुरु करण्यात आले.

डॉक्टरांच्या सूचनेनुसार ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी, युरिन आणि शुगर टेस्ट करण्यात आली. यानंतर लगेचच रुग्णावर ओपेशन करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. याची तयारी जेमतेम 30 मिनिटात करुन शस्त्रक्रिया झाली. या रुग्णाला उपचारासाठी आणखी उशीर झाला असता तर त्याच्या जीवालाही धोका होता, अशी माहिती कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here