त्या ऑडिओ क्लिपद्वारे अफवा पसरवणाऱ्या तीघांविरुध्द गुन्हा दाखल;दोघांना घेतले ताब्यात
गणेश भोळे
बार्शी : सोशल मिडियावर अनाधिकृत रेकॉर्डिग खरे आहे किंवा नाही याची खात्री न करता समाईक करून लोकांत भितीचे वातावरण पसरवल्याबाबत बार्शी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

यात पवन औदुबर जाधव (वय २८रा अलीपुर रोड व्हन कळस प्लॉट ,बार्शी ) भैरू नागनाथ माने (वय ३१ व्हनकळस प्लॉट ) रवी वसंत जाधव ३४रा उपळाई प्लॉट शेंडगे प्लॉट बार्शी ) या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

गेली दोन दिवसापासुन सोशल मिडियावरून सरदच्या वादग्रस्त क्लीप मधील दोन व्यक्ती व त्या क्लीप मध्ये उल्लेख असलेली बार्शीतील व्यक्ती असे तिघेजण पुण्यातील एकाच खोलीत राहत असल्याची क्लिप प्रसारीत झाल्याने बार्शीत भितीचे वातावरण होते त्या अनुषंगाने हि कारवाई करण्यात आली
याबाबत कोरोना बाबत कोणीही सोशल मिडियावर चुकिच्या भयभित करणाऱ्या क्लिपद्वारे अफवा पसरवु नये अन्यथा त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तरी कोणीही अफवा पसरवु नये असे आवाहन बार्शीचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे