तालुक्यातील व्हळे शेलगाव मंदिरातील देवाची पंचधातुची मूर्ती गेली चोरीला

  0
  300

  तालुक्यातील व्हळे शेलगाव मंदिरातील देवाची  पंचधातुची  मूर्ती गेली  चोरीला

  बार्शी ( प्रतिनिधी) बार्शी तालुक्यातील शेलगाव (व्हळे) येथील  मंदिरातील सुमारे सहा हजार रुपये किंमतीची मूर्ती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  अधिक माहिती अशी की शेळगाव व्हळे येथे पौराणिक नृसिंह मंदिर आहे या मंदिरात काही दगडी मुर्ती आहेत तसेच काही दिवसा पूर्वी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून  मिरवणुकीसाठी  साडेचार किलो वजनाची पंचधातु ची मूर्ती उत्सव मूर्ती आणली होती.

  अशा सर्व मूर्ती एकाच मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या त्याची नियमितपणे पूजा, आरती करण्याची जबाबदारी ही पुजारी रामहरी महादेव व्हळे यांचेकडे असायची दि १४ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या  पूजा आणि शेज आरती केली आणि इतर लोकांना दर्शन घेता यावे यासाठी नेहमीप्रमाणे मंदिराचे शटर ला कुलूप न लावता फक्त शटर पुढे करून घरी जाऊन जेवण वैगेरे करून झोपले  आणि दि १५  रोजी सकाळी सात वाजता पूजा करण्यासाठी पुजारी मंदिरात आले असता त्यांना मंदिरातील पंच धातू ची मूर्ती ठेवलेल्या जागेवर दिसून आली नाही.

  म्हणून मंदिरात आणि मंदिरा बाहेर शोध घेतला पण मूर्ती दिसली नाही म्हणून गावातील  सुभाष व्हळे, शिवाजी पाटील रामलिंग बारबोले,नवनाथ जगझाप यांना ही बाब सांगितली त्यांनी ही परिसरात मूर्ती चा शोध घेतला मात्र मूर्ती सापडली नाही त्यामुळे मूर्ती चोरीला गेली असल्याची खात्री झाली म्हणून याबाबत पुजारी रामलिंग व्हळे यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे याबाबत भादवी ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत

  Best IT Comany In Maharashtra , Solapur