तामिळनाडूत कोरोनाचा पहिला बळी, देशातील मृतांची संख्या 11 वर 

0
432

मदुराई | कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडून अजून एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. कोरोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला आहे. तर देशातील मृतांची संख्या आता 11 वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे ही व्यक्ती विदेशात जाऊन आलेली नव्हती. 23 मार्चला या व्यक्तीला संक्रमन झाले होते. यानंतर राजाजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या 54 वर्षीय रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.  या रुग्णाला मधूमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत होती. आज सकाळी या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तामिळनाडूत आतापर्यंत कोरोनाचे 18 प्रकरण समोर आले आहेत. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक बरा झाला आहे. देशभरात कोरोनाचे आतापर्यंत 560 प्रकरणं समोर आले आहेत. यामधील 11 जणांचा मृत्यू आणि 46 बरे झाले आहेत. रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोनाचा धोका कमी करता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाउन केल्याची घोषणा केली. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur