तरुणांनो आपल्या शक्तीचा वापर सकारात्मक कामासाठी करा- आ.रोहित पवार

    0
    276

    आपल्या शक्तीचा वापर सकारात्मक कामासाठी करा- आ.रोहित पवार

    डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथील विद्यार्थी संवाद कार्यक्रमात प्रतिपादन

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    उस्मानाबाद- कॉलेजमधील युवकांमध्ये खूप मोठी शक्ती असते मात्र या शक्तीचा उपयोग सकारात्मक कामासाठी केला तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास तर होतोच मात्र त्याबरोबरच समाजासाठी देखील ही शक्ती कामी येते असे प्रतिपादन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गडपाटी,उस्मानाबाद येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल या ठिकाणी विद्यार्थी संवाद या कार्यक्रमादरम्यान केले.

    यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, रविकांत वरपे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य पृथ्वीराज पाटील,नगरसेवक प्रदीप घोणे,माजी नगराध्यक्ष अमित शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भूम तालुका अध्यक्ष सतीश सोन्ने,वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष सुशील शेळके,सचिन तावडे,प्रवीण तांबे,रोहित बागल,अभिजित जगताप,अमोल सुरवसे हे उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्‍वरी शिक्षण समाजाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले होते.

        पुढे बोलताना आ.रोहित पवार म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांसमोर वेगळी आव्हाने आहेत. जगासोबत राहायचे असेल तर आपलं ज्ञान हे अद्यावत ठेवलं पाहिजे तरच आपण या जगामध्ये टिकू शकतो. दर दहा वर्षांनी समाजात व उद्योग क्षेत्रात वेगवेगळे बदल घडत आहे त्या बदलाला आपण सामोरे गेले पाहिजे तसेच आपल्या हातात इंटरनेट आहे त्याचा वापर देखील आपल्या विकासासाठी केला गेला पाहिजे. 
    

    एखादे काम हातात घेतले की ते काम पूर्ण होईपर्यंत किंवा त्यात यश मिळेपर्यंत विद्यार्थ्यांनी चिकाटी धरली पाहिजे.यावेळी अनेक विद्यार्थ्यांना कौटूंबिक प्रश्न विचारत त्यांनी बोलते केले.रात्री खुप उशीर होऊनही विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनीतुडूंब गर्दी केल्याचे पाहून आ.रोहित पवार हे भारावून गेले होते.

    यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रास्ताविक करताना शिक्षण समूहाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

    सुत्रसंचलन सुजित जमदाडे यांनी तर आभार प्रा.तुषार वाघमारे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सुरज ननवरे,प्रा.अर्शद शेख,प्राचार्य अमर कवडे,प्राचार्य कैलास मोटे,प्रा.हरी घाडगे,दत्तात्रय घावटे,अशोक सोन्ने,अशोक जगताप यासह विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur