आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही चौथा उमेदवार देखील आरामात निवडून आणणार, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. भाजपकडे चौथी जागा निवडून आणण्यासाठी जे संख्याबळ आवश्यक आहे ते संख्याबळ आहे. त्यामुळे आमची चौथी जागा निवडून येण्यात काहीही अडचण येणार नाही असे फडणवीसांनी बोलून दाखविले आहे.
येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. भाजपाचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. मात्र चौथा उमेदवारही आम्ही निवडून आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 9 जागांसाठी होणारी विधानपरिषदेची निवडणूक ही सरळ सरळ भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीला 2, शिवसेनेना 2, काँग्रेसला 1, भाजपला 3 जागा मिळू शकतात. तर अखेरच्या नवव्या जागेसाठी मात्र चुरस आहे. याच जागेवर फडणवीसांनी आपला दावा केला आहे.
