तबलिगी जमातच्या रुग्णांचे पुन्हा गैरवर्तन; नर्ससमोर अश्लील कृत्य, नग्न होऊन घाणेरडे इशारे

0
269

दिल्लीतील निजामुद्दीन इथल्या तबलिगी जमातच्या मरकजमध्ये 9000 लोक सहभागी झाले होते. यातील अनेक लोक आपापल्या राज्यात परतली असून काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्याना त्या-त्या राज्यातील रुग्णालयात आणि घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र तबलिगी जमातचे रुग्ण गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे.

तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या काही नागरिकांना गाझियाबाद येथील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांना आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. मात्र इथे ठेवलेल्या सगळ्यांनी उच्छाद मांडायला सुरुवात केली आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत गैरवर्तन करायला सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही लोक उपचारासाठी आलेल्या नर्सला पाहून अश्लील कृत्य आणि घाणेरडे इशारे करत आहेत. तसेच रुग्णालयात नग्न फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गाझियाबाद CMO ने स्थानिक पोलिसांना याबाबत पत्र पाठवून माहिती दिली आहे. तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेली लोक रुग्णालयात कर्मचारी वर्गासोबत वाईट वागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या काही रुग्णांनी अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसोलेशन वार्डात रुग्ण पॅन्ट काढून फिरत असून अश्लील इशारे आणि गाणी म्हणत आहेत. तसेच सिगारेटची मागणी करत असून नर्सला घाणेरडे इशाराही करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करणे अशक्य होतं आहे, असेही पत्रात म्हंटले आहे.

याआधी दिल्लीतील निजामुद्दीन इथल्या तबलिगी जमातच्या मरकजमधून बाहेर काढलेल्या 167 जणांना रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या क्वारंटाईन केंद्रावर ठेवण्यात आले होते. येथेही रुग्णांनी रुग्णालय कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केले. उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की ‘हे लोकं वाट्टेल ते खायला मागत होते. क्वारंटाईन केंद्रावरील लोकांशी गैरव्यवहार करत होते.

यातील अनेकांनी या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर थुंकायला सुरुवात केली. कोणाचंही न ऐकता संपूर्ण इमारतीमध्ये त्यांनी फिरायला सुरुवात केली.’ या त्रासाला कंटाळून रेल्वे अधिकाऱ्यांनी कडक सुरक्षा व्यवस्था असेल किंवा इतर कोणत्याही सुरक्षित स्थळी या सगळ्यांना हलवण्यात यावे अशी विनंती केली. ही विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याची माहिती प्रवक्ते दिपक कुमार यांनी दिली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur