डॉ . भगवान नेने यांच्या निधनाने बार्शीरत्न हरपले आहे त्यांच्या जाण्याने कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे . असा भगवंत पुन्हा होणे नाही कॅन्सर हॉस्पीटलच्या माध्यमातुन त्यांनी बार्शीचे नाव देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर उज्वल केले अशी प्रतिक्रिया माजी मंत्री दिलीप सोपल यांनी डॉ नेने यांच्या निधनानंतर दिली आहे.

बार्शी: बार्शीतील जगप्रसिध्द नर्गिस दत्त मेमेरियल कॅन्सर हॉस्िपटलचे संस्थापक चेअरमन डॉ़ भगवान उर्फ शरद महादेव नेने यांचे वृध्दापकाळाने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले़त्यांचे वय ८० वर्षे होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई असा
परिवार आहे़ डॉ़ नेने यांना फुफुसाचा आजार होता़ त्यांना दम लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्िपटलमध्ये उपचार सुरु होते़ अखेर आज सायंकाळी साडेसहा
वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.