डॉ .भगवान नेने यांच्यामुळे आज आपल्या बार्शीचे कॅन्सर हॉस्पीटल उभे आहे त्यांनी ३५ वर्ष निस्वार्थपणे जी सेवा केली त्याला तोड नाही मी त्यांच्या वाटचालीची साक्षीदार आहे .ते निष्णात आणि निगर्वी डॉक्टर होते. त्यांच्या मनाला स्वार्थी पणाचा साधा स्पर्श देखील कधी झाला नाही. त्यांच्या निधनाने खूप मोठी हानी झाली असल्याचे माजी आमदार प्रभाताई झाडबुके म्हणाल्या.
बार्शीतील जगप्रसिध्द नर्गिस दत्त मेमेरियल कॅन्सर हॉस्िपटलचे संस्थापक चेअरमन डॉ़ भगवान उर्फ शरद महादेव नेने यांचे वृध्दापकाळाने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले़त्यांचे वय ८० वर्षे होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई असा
परिवार आहे़ डॉ़ नेने यांना फुफुसाचा आजार होता़ त्यांना दम लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्िपटलमध्ये उपचार सुरु होते़ अखेर आज सायंकाळी साडेसहा
वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १०४० रोजी मिरज येथे झाला़ सेंट झेव्हियर्स कॉलेज मुंबई येथे इंटरसायन्स पुर्ण केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण ग्रँन्ट मेडिकल व
जे़जे़ हॉस्पिटल मुंबई येथे घेऊन १९६२ साली वैद्यकीय पदवी मिळवली़तर पुढे एम़डी़ मेडिसीन ही पदवी प्राप्त केली़१९७१ मध्ये लंडन येथे एमआरसीपी ही वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी घेतली.
मायदेशी येऊन डॉ़ हिरेमठ हॉस्पिटलमध्ये वैद्कीय सेवा सुरु केली़ अचून निदानाचे वरदान लाभलेले डॉ नेने यांनी त्याकाळी चार जिल्ह्यातील रुग्णांना सेवेचा लाभ झाला़ अनेक डॉक्टर त्यांचा सल्ला घेत होते़ त्यांनी टी़बी़ मधुमेह,व ह्दयरोगांच्या रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले़ १९९ ० साली दिल्लीत झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत बर्न
इंज्युरी या विषयावर शोध निबंध सादर केला़ ही सेवा देत असताना विविध रोगांवरील वैद्यकीय शिबीरेही आयोजित केली़ त्यांच्या कार्याची दखल २००४ साली प्रकाशित झालेल्या वर्ल्ड कॅन्सर अहवालामध्ये कॅन्सर हॉस्पिटलविषयी गौरवोदगार काढलेआहेत़ इंटननॅशनल बायोग्राफी सेंंटर ग्रेट बिटन यांनी द वर्ल्ड हा पुरस्कार देऊन ही गौरवले आहे.