डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

0
261

ग्लोबल न्यूज : डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यांच्या वाहनाचे नुकसान केले तर संबंधित हल्लेखोरांकडून दुप्पट पैसा वसूल केला जाईल. त्याचबरोबर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यावरील हल्ला करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली .

देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार लवकरच कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या नव्या अध्यादेशामुळे हल्लेखोरांना जामीन मिळणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास ३० दिवसांमध्ये पूर्ण केला जाईल. अशा घटनांमधील दोषींना ३ महिने ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होईल. तसेच ५० हजार ते २ लाखांपर्यंत दंडही आकारला जाणार असल्याचे मंत्री जावडेकर यांनी सांगितले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन मागे

दरम्यान, देशभरात जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गाचा मुकाबला करीत असलेल्या डॉक्टरांवर तसेच घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अनेक ठिकाणी समाजकंटकांनी हल्ले केले. काही ठिकणी जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार घडले. त्यामुळे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या पार्शवभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज ( बुधवारी) सामूहिक निदर्शने करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला होता. दरम्यान, या सर्व प्रकरणांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गंभीर दाखल घेतली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तातडीने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. या चर्चेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur