ठाकरे सरकार मधील दुस-या मंत्र्याची कोरोनावर मात

0
389

मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर ठाकरे सरकार मधील दुस-या मंत्र्याने कोरोनावर मात केली आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली असून,त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना आज ब्रिज कॅडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एका कोरोनाबाधीत पोलीस अधिका-यांच्या संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना फोर्टीस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.त्यानंतर ठाकरे सरकार मधील दुसरे मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना २५ मे रोजी येथील ब्रिज कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाची लागण झाल्याच्या एक आठवड्यापूर्वी अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला गेले होते.मुंबईतून नांदेड मध्ये त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते.त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निषन्न झाले होते.त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २५ मे रोजी अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आले होते.

येथिल ब्रिज कॅडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांची आज कोरोनाची चाचणी करण्यात आली असता ही चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.डिस्चार्ज नंतर ते चर्चगेट जवळील आपल्या निवासस्थानी रवाना झाले असून आता त्यांना १४ दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागणार आहे.गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्यानंतर कोरोनावर मात करणारे ठाकरे सरकार मधील अशोक चव्हाण हे दुसरे मंत्री आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur