ठाकरे सरकारला नारळ द्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली राज्यपालांकडे मागणी….!

0
255

ठाकरे सरकारला नारळ द्या वाचा कोणी केली राज्यपालांकडे मागणी….!

ग्लोबल न्युज:“ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, अशी जोरदार टीका राणेंनी केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर मोठे संकट आहे, असे नारायण राणे म्हणाले.आतापर्यंत जे काही दिले ते केंद्र सरकारने दिले आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे न समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षित कसं ठेवावे याचा अभ्यास नाही. त्यामुळे असा कारभार सुरु आहे, असंही राणे म्हणाले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur