ट्रोलच्या जनकांना ट्रोल विरोधात तक्रार करण्याची आली वेळ – सचिन सावंत

0
229

ट्रोलच्या जनकांना ट्रोल विरोधात तक्रार करण्याची आली वेळ – सचिन सावंत

सूरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टिका करणारे तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. अशा मागणीचे पत्र आज भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

यावेळी यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते मात्र भाजप नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची घेतलेल्या भेटीवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी भाजपा नेत्यांना ट्विटरच्या माध्यमातून चांगलाच टोला हाणला आहे.

“ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोल् विरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेंड बबूल का, आम कहांसे खाय? २०१४ नंतर देशात ट्रोलधाड भाजपाने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले.

अजून धर्मांधता भाजपा ट्रोल्स पसरवतात. तरीही शिवीगाळ,धमक्या असतील तर पोलिसांनी कारवाई करावी’ दरम्यान, काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर असे सुद्धा प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखविले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur