ज्याचं डिपॉजीट जप्त झालंय अशांची कशाला नोंद घ्यायची- शरद पवार

0
485

बारामतीत डिपॉझिट जप्त झालं, सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही – शरद पवार

सातारा, २७ जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पडळकर काय म्हणाले होते? 

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here