जोतिरादित्य शिंदे भाजपा कोट्यातून झाले खासदार
राज्यसभेच्या एकूण २४ जागांपैकी १९ जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्याचे निकाल हाती आले आहेत. राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, आंध्रप्रदेशात चारही जागा वायएसआर काँग्रेसला, राजस्थानात दोन काँग्रेस, एक भाजप आणि मध्य प्रदेशात दोन भाजप तर एक जागा काँग्रेसला मिळाली.


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मध्य प्रदेशात भाजपकडून रिंगणात असलेले ज्योतिरादित्य शिंदे विजयी झाले आहेत. याशिवाय काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांनीही बाजी मारली. आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये चुरस पाहायला मिळली. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. त्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास निकाल हाती आले.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटकात चारही जागांवर, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एका जागेवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.