जिल्हास्तरीय गुणवत्ता शोध चाचणी स्पर्धा प्रथम तीन क्रमांकात मोहोळचे ५ तर बार्शी, माढा, द.सोलापूरचे प्रत्येकी ४ विदयार्थ्यांनी मिळवले प्राविण्य

  0
  280

  जि.प.प्रा.शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता शोध चाचणी स्पर्धा

  प्रथम तीन क्रमांकात मोहोळचे ५ तर बार्शी, माढा, द.सोलापूरचे प्रत्येकी ४ विदयार्थ्यांनी मिळवले प्राविण्य 

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  बार्शी :

  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेलया विदयार्थी गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेन्ट हन्ट) जिल्हास्तरीय परिक्षेत मोठया गटात (६ वी ते ८ वी)मोहोळ, बार्शी, माढा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जि.प.शाळेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. नुकताच या परिक्षांचा निकाल जाहीर झाला. 

  जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने लहान व मोठया गटात विदयार्थी गुणवत्ता शोध चाचणी नुकतीच घेण्यात आली.  चित्रकला, वादविवाद, वक्तृत्व, हस्तकला, नृत्य, नाट्य, वादन, प्रश्नमंजूषा, गायन या प्रकारात या स्पर्धा झाल्या. तालुकास्तरावर यश मिळवलेल्या विदयार्थ्यांमधून जिल्हास्तरासाठी प्रत्येक तालुक्यातून दोन विदयार्थ्यांची निवड झाली होती. यात मोठया गटातून मोहोळ तालुक्यातील ५ जणांनी, त्यापाठोपाठ बार्शी, माढा व द.सोलापूर तालुक्यातील  प्रत्येकी ४ जणांनी , सांगोला , पंढरपूर, अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येकी ३ जणांनी तर उत्तर सोलापूर, करमाळा व माळशिरस तालुक्यातील प्रत्येकी २ जणांनी प्राविण्य मिळवले. 

  विविध स्पर्धा प्रकार व यश मिळवलेले विदयार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय 

  चित्रकला : 

  सानिका सुरेश बोले (सांगोला), मनोज मल्लिकार्जून कोळी (द.सोलापूर), दिग्वीजय विलास शेळके (मोहोळ)

  वादविवाद : 

  स्नेहल रंजीत वाळवेकर (माळशिरस), तनवी संजय वागज (मोहोळ), स्वराली दत्तात्रय करडे (बार्शी)

  वक्तृत्व : 

  प्रतिक्षा लक्ष्मण फरतडे (करमाळा), सुमित्रा युवराज गुंड (उत्तर सोलापूर), बीबीफातेमा शौकतअली मोमीन (द. सोलापूर) 

  हस्तकला : 

  आदित्य श्रीशैल हाके (द.सोलापूर)प्रथम विभागून, प्रियंका हणमंत करजगी (अक्कलकोट)प्रथम विभागून ; अश्विनी आण्णा डोंगरे (पंढरपूर), हिंदवी सुशील हांडे (करमाळा) तृतीय विभागून ; प्रेरणा धनाजी गायकवाड (माढा) तृतीय विभागून

  नृत्य : 

  प्रज्ञा यशवंत कांबळे (मोहोळ), साक्षी मोहन घाडगे (सांगोला), अंकिता नागनाथ साळुंके (बार्शी) 

  नाट्य : 

  सुमीत पुजारी (द.सोलापूर), ऋगवेद सुहास जोशी (माढा), सायली मधुकर मोरे (पंढरपूर) तृतीय विभागून ; वैभव सिध्देश्वर बारडोळे (उत्तर सोलापूर) तृतीय विभागून 

  वादन :

   सुयश सुसेन कांबळे (बार्शी), रेवणसिध्द पुंडलिक फुलारी (अक्कलकोट) द्वितीय विभागून, प्रणव सोमनाथ शिंदे (माढा)द्वितीय विभागून, प्रसाद संपत घोडके (सांगोला) तृतीय विभागून, गुरूराज हणमंत वाघमोडे (मोहोळ) तृतीय विभागून,

  प्रश्नमंजूषा  : 

  सिमरन म.शरीफ मुलाणी (पंढरपूर), आदित्य बाबासाहेब करडे (बार्शी), शिवानी धनाजी वाघमोडे (माळशिरस),

  गायन : वृषाली मंगेश वाळके (माढा), दिव्या महादेव अमाणे (अक्कलकोट) द्वितीय विभागून, सानिका अर्जून इमडे (सांगोला) द्वितीय विभागून, साहील विजय कांबळे (मोहोळ) 

  बार्शीच्या कांदलगांव जि.प.शाळेचे दोन विदयार्थी जिल्हास्तरावर चमकले 

  या जिल्हास्तरीय स्पर्धेत बार्शी तालुक्यातून ४ विदयार्थ्यांनी यश मिळवले. कासारवाडी जि.प.शाळेचा विदयार्थी सुयश कांबळे वादन स्पर्धेत प्रथम आला. खांडवी जि.प.मुलींच्या शाळेतील अंकिता साळुंके ही नृत्य स्पर्धेत तृतीय आली. तर कांदलगांव जि.प.शाळेतील आदित्य करडे हा प्रश्नमंजूषा स्पर्धेत द्वितीय आला तर याच शाळेतील विदयार्थिनी स्वराली करडे ही वादविवाद स्पर्धेत तृतीय आली.

  कांदलगांव जि.प.शाळेने तालुकास्तरावरही उल्लेखनीय यश मिळवले होते. उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, बार्शीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, विस्तार अधिकारी धनाजी जाधवर, कांदलगांव शाळेचे मुख्याध्यापक अबुलफैज सौदागर, मार्गदर्शक शिक्षीका शैलजा उकिरडे, निर्मला शिंदे, अंबिका शिंदे, रेखा कुकडे, सरपंच सीता कदम, उपसरपंच कैलास फुरडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप नवले यांनी अभिनंदन केले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur