जयंत पाटलांनी दिला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना अजब सल्ला वाचा…..!
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारले आहे. तर हे आंदोलन कसे करावे याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर माहिती काल दिली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला.


जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना ट्विट करत टोला लगावला आहे.चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! असे म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तर राज्य सरकार सगळंं ठीक आहे,असे आभासी चित्र उभं करत आहे. अजून शेतकरी वर्गासाठी कोणतीही घोषणा नाही. तर व्यवसायिकांना अद्याप कोणताच दिलासा दिला नाही.

त्यामुळे या सरकारला जाग येण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे स्वरूप कसे असेल याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.