जयंत पाटलांच्या ‘त्या’ फोनमुळं 39 पर्यटकांना धीर

  0
  266

  मुंबई । पर्यटनासाठी उज्बेकिस्तानच्या ताश्कंद येथे गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३९ नागरिक कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे विमानसेवा नसल्याने अडकून पडले आहेत. मायदेशी परतण्याची शक्यता दिसत नसल्याने बिथरलेल्या त्या पर्यटकांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना थेट उज्बेकिस्तान येथून व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी ‘आपण घाबरू नका, मी ही माहिती पवारसाहेबांच्या कानावर घालतो’ जयंत पाटील यांचे हे शब्द ऐकून त्या पर्यटकांना मोठा धीर आला आहे.

  सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. जगभरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. अशातच महाराष्ट्रातील जवळपास ३९ नागरिक विमानसेवा नसल्याने उज्बेकिस्तानच्या ताश्कंद येथे अडकले आहेत. १० मार्च रोजी हे पर्यटक भारतातून गेले होते सोमवारी (१६ मार्च) हे पर्यटक मायदेशी परतणार होते मात्र ऐनवेळी त्यांना विमानसेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  घाबरलेल्या या पर्यटकांनी मंत्री जयंत पाटील यांना व्हिडिओ कॉल लावला आणि परिस्थिती सांगितली. तुम्हाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वच प्रयत्न केले जातील. तसेच शरद पवारसाहेबांना ही माहिती देतो आणि तुम्हाला परत आणण्यासाठी केंद्राकडे शब्द टाकण्यासाठी विनंती करतो असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी त्या पर्यटकांना दिले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur