‘कोरोनावर लस उपलब्ध झालेली नसून त्यावर संशोधन सुरू’
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू झाले. 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. येत्या पुढील सात दिवसांत कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा हा 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.

यावेळी WHO चे महासंचालक टेडरॉस अधनॉम म्हणाले की, “आकडेवारीनुसार पुढच्या आठवड्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्याही एक कोटींवर पोहोचू शकते. हे संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. अद्यापही कोरोनावर लस उपलब्द झालेली नसून त्यावर संशोधन सुरू आहे. लस कधी येईल हे सांगता येत नाही. पण हा पसरणारा रोग कसा रोखता येईल, यावर विचार करणं गरजेचं आहे.”

अमेरिकेत वेगानं कोरोनाचा संसर्ग वाढत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक जास्त आहे. यामुळे ही चिंतेची बाब आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका सर्वाधिक आहे.

दरम्यान, सध्या जगात एकूण रुग्णांची संख्या 93 लाख 53 हजार 735 असून त्यामध्ये 4 लाख 79 हजार 805 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 38 लाखहून अधिकक अॅक्टिवेट केसेस आहेत.