जगभरात कोरोनाचा हाहाकार: बाधितांची संख्या 15 लाखांवर, मृतांचा आकडा 88,441 वर ;वाचा सविस्तर-

0
287

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची संख्या कालच्या (मंगळवार) एका दिवसात 83 हजार 457 ने वाढल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 15 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (गुरूवार) सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 लाख 17 हजार 095 इतकी झाली आहे.

मृतांचा आकडा 6 हजार 398 वाढून 88 हजार 441 झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 29 हजार 955 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 10 लाख 98 हजार 699 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 48 हजार 092 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

अमेरिका – कोरोनाबाधित 434,062 (+31,070), मृत 14,774 (+1,926)
स्पेन – कोरोनाबाधित 148,220 (+6,278), मृत 14,792 (+747)
इटली – कोरोनाबाधित 1,39,422 (+3,836), मृत 17,669 (+542)
जर्मनी – कोरोनाबाधित 1,13,296 (+5633), मृत 2349 (+333)
फ्रान्स – कोरोनाबाधित 1,12,950 (+3881), मृत 10,869 (+541)
चीन – कोरोनाबाधित 81,802 (+0), मृत 3,333 (+0)
इराण – कोरोनाबाधित 64,586 (+1,997), मृत (+121)
यू. के. – कोरोनाबाधित 60,733 (+5,491), मृत 7097 (+938)

टर्की – कोरोनाबाधित 38,226 (+4,117), मृत 812 (+87)
बेल्जियम – कोरोनाबाधित 23,403 (+1,209), मृत 2,240 (+205)
स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 23,280 (+1,027), मृत 895 (+74)
नेदरलँड – कोरोनाबाधित 20,549 (+969) , मृत 2,248 (+147)
कॅनडा – कोरोनाबाधित 19,438 (+1,541), मृत 427 (+46)
ब्राझील – कोरोनाबाधित 16,188 (+2,154), मृत 820 (+134)
पोर्तुगाल – कोरोनाबाधित 13,141 (+699) , मृत 380 (+35)
ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 12,942 (+303), मृत 273 (+30)
दक्षिण कोरिया – कोरोनाबाधित 10,384 (+53), मृत 200 (+8)

इस्राईल – कोरोनाबाधित 9,404 (+156) , मृत 73 (+8)
रशिया – कोरोनाबाधित 8,672 (+1,175), मृत 63 (+5)
स्वीडन – कोरोनाबाधित 8,419 (+726) , मृत 687 (+96)
आयर्लंड – कोरोनाबाधित 6,074 (+365), मृत 235 (+25)
ऑस्ट्रेलिया – कोरोनाबाधित 6,052 (+64), मृत 50 (+1)
नॉर्वे – कोरोनाबाधित 6,042 (+0), मृत 101 (+12)
भारत – कोरोनाबाधित 5,916 (+565) , मृत 178 (+18)

आकडेवारीत अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रगत राष्ट्रांनी कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविल्यामुळे त्यांच्याकडील आकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या मानाने भारताची कोरोना चाचण्यांची क्षमता खूपच कमी आहे. भारतातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढेल तसतशी ही आकडेवारीही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur