जगण्यातील संघर्षावर मात करून त्यांनी निवडली वेगळी वाट !
विधवांच्या हाती आता चारचाकीचे स्टेरिंग
केज : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या चा आकडा वाढत आहे. अनेक कुटूंब उघड्यावर पडत आहेत. तात्पुरती सरकारी मदत दिली जाते. कुटुंबाचा कर्ता गेल्याने विधवा महिलांना घराचा गाडा हाकताना संघर्षाला सामोरे जावे लागते केज तालुक्यातील त्या विधवा महिलांसाठी नायब तहसिलदार आशा वाघ, अंकुर स्वयंसेवी संस्था, एकल महिला संघटना यांनी एकत्र येऊन प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम दिल्याने चारचाकी वाहन चालवण्यासाठी या महिला सज्ज झाल्या आहेत.

वाहन चालवण्याचे प्रशिक्षण ज्ञानेश्वर ड्रायव्हिंग मोटार ड्रायव्हिंग स्कूल आंबेजोगाई शाखा केज यांच्या वतीने नागरगोजे प्रशिक्षक शिवाजी कांबळे हे प्रशिक्षण देणार आहेत.
प्रशिक्षणार्थी तृतीयपंथी गौरी शिंदे, मुस्लिम समाजातील महिला तसलीम इनामदार, शेतकरी आत्महत्या कुटुंबातील किशोरी गुंड, विधवा जयश्री घोळवे, निकिता गुंठाळ, राणी राऊत, मीरा नाईकवाडे ,पूजा पारवे, भाग्यश्री काकडे,आदींनी आज प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
ग्रामीण भागातील खेडेगावातील महिलांनी क्रांतिकारी निर्णय घेत ड्रायव्हिंग शिकून कुटुंब करण्याचा निर्णय घेतला त्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ड्रायव्हिंग ची सुरुवात झाली मोटार ड्रायव्हिंग साठी लागणारा खर्च एका अनामिक दात्यांनी केला आहे.