छावा प्रतिष्ठानकडुन शंभूराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
बार्शी प्रतिनिधी
येथील छावा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या सोहळ्यासाठी
श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश थोरात , गटनेते दिपक राऊत,पाणीपुरवठा सभापती संतोष बारुंगुळे,बालाजी डोईफोडे , उमेश काळे ,कालभैरव पतसंस्थेचे देविदास बापू बारंगुळे, सुहास कांबळे , विजय राऊत, सुमित बारंगुळे, सागर मगर आदी उपस्थित होते .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला,यावेळी शिवव्याख्याते खंडू डोईफोडे यांनी आपल्या शैलीतून विचार मांडले, तसेच प्राचार्य थोरात यांनीही छावा प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या .

छावा प्रतिष्ठान च्या वतीने सामजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वृक्ष संवर्धन समितीची पूर्ण टीम तसेच अँनिमल फ्रेंड्स सर्कल ची पूर्ण टीम यांचा सन्मान करण्यात आला तसेच युवा उद्योजक म्हणून अनुबंध ट्रॅक्टर चे अक्षय गुंड यांचा देखील सन्मान करण्यात आला,
कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर कार्यक्रमस्थळी दूध वाटप करण्यात आले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शुभम चव्हाण यांनी केले,
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम तुपे, शुभम चव्हाण,अजिंक्य बारंगुळे सचिन काकडे,सागर बारंगुळे,समर्थ तुपे अक्षय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्यासह सर्व शंभूभक्त यांनी परिश्रम घेतले..
___