छत्रपती ग्रुप च्या होम मिनिस्टर कार्यक्रमांत मोहिनी बारंगुळे ठरल्या पैठणीच्या मानकरी; दोन हजार महिलांचा सहभाग

  0
  296

  छत्रपती ग्रुप आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये दोन हजार महिलांचा सहभाग

  बार्शी: छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त महिला दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी छत्रपती ग्रुप च्या वतीने होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये साधारणपणे 2 हजार महिलांच्या उपस्थितीत 1472 महिला स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


    प्रत्येक  सहभागी महिला स्पर्धकांसाठी आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन  आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ शितल बोपलकर , डॉ प्रभावती लाड , पोलीस अधिकारी सिंधुताई देशमुख, विजयमाला पाटील, नगरसेविका  कल्पना गायकवाड , राजेश्री डमरे-तलवाड , तेजस्विनी कथले , निलोफर तांबोळी , माधवी वायकुळे उपस्थित होते.

  या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक स्पर्धेमध्ये महिलांनी उत्साहात सहभाग घेऊन आपल्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला.

  या कार्यक्रमाचं  सादरीकरण  प्राध्यापक दत्तात्रय जाधव  यांनी  अतिशय  प्रभावीपणे  महिलांचा उत्साह वाढवणारे  पद्धतीने सादरीकरण केले  

  स्पर्धेत  होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या  मोहिनी संतोष बारंगुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजयी पैठणीचा मान मिळवला.  तसेच दुसरा क्रमांक स्नेहा वायकर यांनी पटकावला.त्यांना द्वितीय क्रमांक पारितोषिक सोन्याची नथ तसेच तृतीय क्रमांक पूजा नागेश बनशेट्टी यांनी पटकावला त्यांना या वेळी चांदीचा करंडा बक्षीस देण्यात आले.

  प्रास्ताविक अध्यक्ष अजय पाटील यांनी केले. मंडळाचे मार्गदर्शक बापू पाटील,पिंटू राऊत ,मिलिंद जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली  बापू पवार ,नवनाथ रोडे, राम पाटील ,अमोल पाटील ,सुरज व्हळे, रोहित वाघमारे ,सारंग चौगुले, राज देवकुळे किरण करंडे रोनक ढवळशंक सागर थोरात विशाल करडे ,नागेश चव्हाण ,सिद्धेश्वर आलाट, विजय धोत्रे ,संदिप पवार ,केतन उपळकर ,संदीप शाहीर ,मसतुद ,संकेत कदम प्रेम रजपुत यांनी परिश्रम घेतले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur