चित्रपट सृष्टीचा अजून एक चमकता तारा निखळला, ऋषी कपूर यांचे निधन
सूरज गायकवाड
ग्लोबल न्युज: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचे आज निधन मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात निधन झालं. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने चित्रपट जगताची मोठी हानी झाली आहे.
ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती.

ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टर करत असलेल्या उपचाराला ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते.