चिंताजनक: सोलापुरात आणखी एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह

0
260

सोलापूर : सोलापूर : सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ येथील 56 वर्षाच्या किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर हा दुकानदार कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. आज त्याच व्यक्तीच्या संपर्कात असलेली एक महिला कोरोना पॉझिटिव आढळल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने तेलंगी पाछा पेठ येथून एक किलोमीटर परिसरात प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.  त्या मयत व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या 94 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. आज दुपारपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एका महिलेचा अहवाल हा पॉझिटिव आला आहे. त्या मयत  व्यक्तीच्या व कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या प्रथम व द्वितीय  संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असून संपर्कात आलेल्या व्यक्तीचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले जात असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 


कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे तेलंगी पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. या दुकानदाराने गेल्या महिनाभरात बाहेरगावी प्रवास केला नसल्याचे कुटूंबीय सांगत होते. त्यामुळे त्यांना नेमकी कोणापासून कोरोनाची लागण झाली याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले होते.

त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयातील एका नर्सचा संपर्क आल्याने त्या नर्सचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

आरोग्य विभागाने रविवारी रात्री तेलंगी पाच्छा पेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. मृताचे कुटूंबीय, संपर्कात आलेल्या लोकांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी त्यांची तपासणी झाली. त्यापैकी 66 जणांचे रिपोर्ट आले असून त्यात एका नर्स महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur