ग्लोबल न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 33 हजार 53 झाली आहे. आज 2,347 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 600 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 7688 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 24 हजार 161 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 73 हजार 239 नमुन्यांपैकी 2 लाख 40 हजार 186 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 33 हजार 55 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 48 हजार 508 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 638 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोविड 19 पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्चमध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण 679 एवढे होते ते मेमधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला 8,628 प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे 13 पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे 1,630 प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण 2,137 एवढे आहे.

राज्यात 63 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1,198 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 38, पुण्यात 9,औरंगाबाद शहरात 6, सोलापूर शहरामध्ये 3, रायगडमध्ये 3, आणि ठाणे जिल्हा, पनवेल शहर ,लातूर तसेच अमरावती शहरात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 44 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 67 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 34 रुग्ण आहेत तर 22 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 63 रुग्णांपैकी 41 जणांमध्ये ( 65 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: 20,150 (734)
ठाणे: 228 (4)
ठाणे मनपा: 1550 (18)
नवी मुंबई मनपा: 1368 (14)
कल्याण डोंबिवली मनपा: 520 (6)
उल्हासनगर मनपा: 101
भिवंडी निजामपूर मनपा: 48 (2)
मीरा भाईंदर मनपा: 300 (4)
पालघर: 61 (2)
वसई विरार मनपा: 359 (11)
रायगड: 239 (5)
पनवेल मनपा: 206 (11)
ठाणे मंडळ एकूण: 25,130 (811)
नाशिक: 105
नाशिक मनपा: 71 (1)
मालेगाव मनपा: 675 (34)
अहमदनगर: 56 (3)
अहमदनगर मनपा: 19
धुळे: 10 (3)
धुळे मनपा: 70 (5)
जळगाव: 205 (26)
जळगाव मनपा: 61 (4)
नंदूरबार: 23 (2)
नाशिक मंडळ एकूण: 1,295 (78)
पुणे: 199 (5)
पुणे मनपा: 3,464 (188)
पिंपरी चिंचवड मनपा: 158 (4)
सोलापूर: 9 (1)
सोलापूर मनपा: 364 (24)
सातारा: 131 (2)
पुणे मंडळ एकूण: 4325 (224)
कोल्हापूर: 30 (1)
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 42
सांगली मिरज कुपवाड मनपा: 8 (1)
सिंधुदुर्ग: 10
रत्नागिरी: 95 (3)
कोल्हापूर मंडळ एकूण: 191 (5)
औरंगाबाद: 97
औरंगाबाद मनपा: 842 (31)
जालना: 28
हिंगोली: 96
परभणी: 5 (1)
परभणी मनपा: 1
औरंगाबाद मंडळ एकूण: 1,069 (32)
लातूर: 42 (2)
लातूर मनपा: 2
उस्मानाबाद: 7
बीड: 3
नांदेड: 57
नांदेड मनपा: 62 (4)
लातूर मंडळ एकूण: 123 (6)
अकोला: 28 (1)
अकोला मनपा: 241 (13)
अमरावती: 6 (2)
अमरावती मनपा: 104 (11)
यवतमाळ: 99
बुलढाणा: 30 (1)
वाशिम: 3
अकोला मंडळ एकूण: 511 (29)
नागपूर: 2
नागपूर मनपा: 355 (2)
वर्धा: 2 (1)
भंडारा: 3
गोंदिया: 1
चंद्रपूर: 1
चंद्रपूर मनपा: 4
गडचिरोली: 0
नागपूर मंडळ एकूण: 368 (3)
इतर राज्ये: 41 (10)
एकूण: 33 हजार 053 (1198)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1688 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14 हजार 972 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 63.83 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.