चिंताजनक ! जगभरात कोरोनाचे 2,698,733 रुग्ण, आतापर्यंत 1 लाख 90 हजार जणांचा मृत्यू

0
288

नवी दिल्ली | जगभरात कोरोना विषाणूने घातलेला कहर काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाच्या या थैमानामुळं संपूर्ण जग ठप्प झाले आहे. या प्राणघातक आजाराने बळी पडलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या आजाराने संपूर्ण जगात 1,90,000 वर पोहचली असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये जवळपास दोन तृतीयांश नागरिक हे युरोपमधील असल्याचं एएफपीने तयार केलेल्या आकडेवारीनुसार सांगण्यात येतं आहे. 

डिसेंबरपासून चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर या आजाराने संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरवले. आणि जगातील 2,698,733 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली. तसेच लागण झालेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत 1,90,089 रुग्णांचा बळी या आजाराने घेतला. जगभरात हातपाय पसरविणाऱ्या कोरोनाचा सर्वाधिक परिणाम युरोपमध्ये झाला. युरोपमध्ये कोरोनाने आतापर्यंत 1,16,221 नागरिकांचा बळी घेतला आहे. तसेच 12,96,248 नागरिक अजूनही कोरोनामुळं बाधित आहे. यानंतर अमेरिकेत 49,963 मृत्यू, इटलीमध्ये 25,549, स्पेनमधील 22,157, फ्रान्समध्ये 21,856 आणि ब्रिटनमधील 18,738 नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भारतातसुद्धा कोरोनाने आपले हातपाय पसरवले असून आतापर्यंत भारतात कोरोनाची 23,077 प्रकरणे नोंदवली गेली आहे. यामध्ये 718 रुग्णांचा बळी गेला असून 4749 नागरिक कोरोनामुक्त झाले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 6,430 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 283 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur