नवी दिल्ली । संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला.
2012 मध्ये दिल्लीत अत्याचाराचा बळी पडलेल्या निर्भयाला आज सात वर्षांनंतर न्याय मिळाला. सर्व कायदेशीर युक्त्या असूनही निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात यश आले नाही. निर्भयाच्या दोषींना अखेर फाशी देण्यात आली आहे. दोषींना फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी म्हणाली की तिला आज न्याय मिळाला आहे, पण तिचा लढा सुरूच राहील.


आज आमचा सात वर्षाचा संघर्ष यशस्वी झाला आहे. देशात प्रथमच चार जणांना फाशी देण्यात आली, आम्हाला न्याय मिळाला पण उशीराचा न्याय मिळाला. यासाठी देशाचे सरकार, राष्ट्रपती आणि न्यायालयांचे आभार.
आमच्या मुलीचे जे झाले त्यावरून संपूर्ण देश लज्जित झाला, परंतु आता या दोषींना फाशी देण्यात आली आहे, तर इतर मुलींनाही न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. या निर्णयावर निर्भयाची आई आशा देवी यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की आज सात वर्षाचा संघर्ष पूर्ण होत आहे. 20 मार्चला निर्भया दिन म्हणून साजरा करणार असल्याचे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.