चला हवा येऊ द्या! काही दुकानांचे दरवाजे उघडण्याचा केंद्राचा निर्णय

0
378

कोरोना व्हायरस लॉकडाऊन मध्ये आणखी काही उद्योग व्यापार सुरू करण्यास केंद्र सरकारने सूट दिली असून त्यामुळे थोडी मोकळी हवा घेता येणार आहेत. इलेक्ट्रिक फॅन, प्रीपेड मोबाईल रिचार्ज दुकाने, पाठ्यपुस्तकांची दुकाने सुरू होणार आहेत तसेच पिठाची गिरणी, दूध डेअरी, ब्रेड आणि डाळ कारखाने सुरू होतील. मात्र ही सूट करोना हॉटस्पॉट कंटेनमेंट नसलेल्या शहरात आणि भागातच मिळणार आहे. दरम्यान राज्य सरकारांनी आपापल्या भागातील परिस्थिती पाहूनच निर्णय घ्यायचा आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयानं 15 एप्रिलला मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून 20 एप्रिल पर्यंत काही व्यवहारांना सूट दिली होती. त्यानंतर 16 एप्रिलला त्यात काही बदल सुचविण्यात आले. पुन्हा वीस तारखेपासून आणखी काही उद्योगांना सूट देण्यात आली. आता ही सूट पुन्हा वाढवली आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी माहिती दिली. कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागातच ही सूट मिळेल. तसेच राज्य सरकारांनी आपापल्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा आहे असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हॉटस्पॉट नसलेल्या भागात काय सुरू होणार

इलेक्ट्रिक पंख्याचे दुकान
प्रीपेड मोबाईल रिचार्ज दुकाने
शालेय पुस्तक दुकाने
पिठाची गिरणी
ब्रेड फॅक्टरी
डाळ मिल
दूध उत्पादक प्लॅन्ट
भाजीपाला उत्पादक संस्था
कृषी मालवाहतूक आणि शेतीची कामे
मधमाशी पालन केंद्र
वयोवृद्ध रुग्णांना दिलासा
काही ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध रुग्णांची देखभाल व सेवा करण्यासाठी अटेंडन्ट ची गरज असते त्यासाठी परवानगी दिली जाणार आहे

शिपिंग वर काम करणाऱ्यांसाठी सूट
हजारो हिंदुस्तानी मर्चंट शिपिंग वर काम करतात अनेक जण जहाजावर अडकले किंवा अनेकांना कामावर जात येत येत नाही त्यांना नोकरी जाण्याची भीती आहे त्यासाठी सायन्स अँड सायन्स ऑफ संबंधी सूचना जारी केली आहे

Best IT Comany In Maharashtra , Solapur