चंद्रकांत पाटील म्हणतात देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस

0
254

विधानपरिषदेचे  तिकिट नाकारल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस आहे. ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. ते एबीपी माझा  वृत्तवाहिनीवर बोलत होते.


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. चार-पाच मे रोजी जेव्हा नाथाभाऊंना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आली तेव्हा पर्यायी उमेदवार तयार ठेवायला नका का? उमेदवारीचा फॉर्म भरता आला नसता, नाचक्की झाली असती. म्हणून अन्य उमेदवारांना मुंबईत आणलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

केंद्राला चुकीची माहिती दिली असे नाथाभाऊंचे म्हणणे असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो, असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पण आता त्यांनी पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे असेही चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

दरम्यान मार्चमध्येच विधान परिषदेचे उमेदवार ठरले होते तसेच खडसे यांच्याबद्दल केंद्राला योग्य माहिती दिली गेली नाही. हे दोन्ही आरोप चुकीचे आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur