चंद्रकांत खैरेंनी दिली मुख्यमंत्री निधीला खासदारकीची पेन्शन
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे या संकटाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अर्थिक बाजू भक्कम बनवण्यासाठी राज्यातील मान्यवरांना आणि जनतेला सढळ हाताने मदत करण्याचे आव्हान केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मदत केली होती त्या पाठोपाठ आता संभाजी नगर जिल्ह्याचे शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी आपली खासदार पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 या खात्यात जमा केली आहे. एखाद्या माजी खासदाराने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपली पेन्शन देण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.
चंद्रकांत खैरे यांनी १९९९ पासून २०१९ पर्यंत सलग चार वेळा संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तिजाय जलील यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी खासदार झाल्यामुळे त्यांना मे २०१९ पासून खासदारकीची पेन्शन सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चालू वर्षातील खासदारकीची पेन्शन मुखमंत्री सहायता निधीला देऊन टाकली आहे. ही रक्कम ५ लाख ९३ हजार २५९ रुपये इतकी होते.
