चंद्रकांतदादा काही लागलं तर कळवा मी आहेच ना ..जयंत पाटलांचा पलटवार; वाचा सविस्तर-

0
289

मुंबई : सत्ताधारी आणि विरोधीपक्षात मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेवर नियुक्ती सदस्य करण्यावरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांना कोरोनाविरोधातील कामावर लक्ष देण्यास सांगितलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचं योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.याला पुन्हा जयंत पाटील यांनी उत्तर देत दादा आपण जास्त फिरू नका.स्वतःची काळजी घ्या.काही कमी जास्त लागलं तर कळवा मी आहेच ना मदतीला असा टोला मारला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले “जयंतराव, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्यांना त्याची गरज सगळ्यात जास्त आहे. भाजपचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदत कार्य करत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोना विरुद्धची लढाई भाजप पूर्ण गांभिर्याने लढत आहे. मात्र, या सर्व लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना कुठे आहे? याची माहिती जयंत पाटील यांनी द्यावी, अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

“आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का?”

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबद्दल जयंत पाटलांच्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांकडे अजून 2 महिने आहेत. हाच ठराव मंत्रिमंडळाने मे जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली हा माझा प्रश्न होता. आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? ज्या 2 रिक्त जागांचा उल्लेख आपण करत आहात त्यांनी पूर्वीच राजीनामे दिलेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला म्हणून राजीनामे दिलेत. मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीत.”

जयंत पाटील म्हणाले, “भाजपला विनंती, कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हा, छोट्या छोट्या गोष्टीत अडकू नका. राज्यपालांकडे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला, त्यातील एका जागेवर मुख्यमंत्र्यांना ठराव करुन पाठवण्याचा निर्णय घेतला, कोरोनामुळे सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, राज्यपाल नियुक्त जी रिक्त जागा आहे, तिथे मुख्यमंत्र्यांना नेमण्यासाठी राज्यपालांनी मंत्रिमंडळ ठरावाची अट घातली, आम्ही तसा ठराव केला, मुख्यमंत्री कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे ते या ठरावाने पूर्ण होईल, त्यामध्ये तांत्रिक अडचणीचा प्रश्न नाही, राज्यपालांनी वेळ न लावता निर्णय घ्यावा, त्यांची शपथ पूर्ण करावी आणि दोन महिन्यानंतर पुन्हा जी नवी नावं देऊ त्यावेळी आम्ही बघू काय करायचं ते.. त्यामुळे भाजपने यामध्ये लक्ष देण्यापेक्षा कोव्हिड १९ विरुद्ध थोडं लक्ष द्यावं”

जयंत पाटील यांचा पलटवार

आता चंद्रकांत पाटील यांच्या या टिकेल जयंत पाटील यांनी ट्विट द्वारे उत्तर दिले आहे.त्यात ते म्हणतात दादा कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना जास्त धोका असतो.त्यामुळे आपण जास्त फिरू नका.स्वतःची काळजी घ्या.काही कमी जास्त लागलं तर कळवा मी आहेच ना मदतीला.

चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते.

भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास @ncpspeaks हे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल असे म्हटले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur