घाबरुन जाऊ नका आजार फार मोठा नाहिये ;कोरोनाचा अंगावर काटा आणणारा स्वानुभव वाचा तिच्याच शब्दात

0
391

Corona_चा_अनुभव ..

गेले अनेक दिवस विडियोमार्फत अनेकांना कळलंच आहे की मला व माझ्या कुटुंबाला #Covid-19 ह्या #Pandemic रोगाची लागण झालेली. सगळ्यांना उत्सुकता होती की कसा झाला? कोणते नियम मोडले? कोणा मुळे झालं? काय त्रास झालाय? खुप त्रास झाला का?

आज संपुर्ण 1 महिना पुर्ण झाला पहिल्या व्यक्तिला घरात ताप येऊन ते म्हणजे माझे आहो Amit Vijay Pawar. ते हिंदुजा रुगणालयात अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. लॉकडाऊन सुरु झाला तशी धडकी मनात होतिच की हॉस्पिटलला क्स होता तर 2 ते 3 दिवस कंटिन्यु ड्युटीवर असायचे. त्यांच्याचसोबत माझे मोठे दिर Niranjan दादा हे ही अत्यावश्याक सेवेत सिक्युरिटी मध्ये कंटिन्यु ड्युटीवर असायचे आणि एकत्र दोघे बाईक वर यायचे जायचे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आम्ही ज्याने जे सांगितलं ते फॉलॉ केलं अगदी गरम पाणी डेटॉल जाड्या मिठाने लाद्या 2 ते 3 वेळा पुसण्यापासुन ते भाज्या सोड्याच्या पाणयात धुणं, बाहेरुन आलेली वस्तु धुवुन वापरणं, लवंग डालचिनिचा चहा रोज, गरम पाणी पिणं, बाहेर जाणार्यांचे कपडे रोज डेटॉल गरम पाण्यात धुणं, गाडी डेटॉल ने पुसणं, 20 सेकेंड्स हैंडवॉश, सैनिटायझर वापरणं सगळं केलं..

कुठे चुकलो ते बाहेर जाणार्या व्यक्तिंना आयसोलेट केलं नाही. आयुष्यात पहिल्यांनदा सगळं कुटुंब एकत्र घरी आणि काहिच कामाचा ताण नाही म्हटल्यावर फुल पत्ते हाऊजी कॅरम रेसिपिझ सुरु होत्या. प्रचंड धम्मालचा माहॉल असताना अचानक नाईटवरुन आले आणि Amit ह्यांना ताप आला. माझ्या नवर्याला माझ्या लग्नापासुन आजवर 4 वर्षात कधिच ताप सर्दी खोकला झाला नाही. पण सगळे स्वतःच्या मनाच्या ढाली वापरत कढी मुळे आलाय किंवा लोंणचं खाऊन असे कारणं देऊन इग्नोर करु लागले. ह्यात चुक मिडियाने करोना विषयी बनवलेल्या इमेजची आहे. ते दाखवायचे करोना पेशंट किती विचित्र खोकतो शिंकतो आणि असं काहिच ह्यांना होत नव्हतं तर संशयाला जागाच नव्हती. 2 तासांचा ताप गेला पण हे आमच्यातच होते खेळायला जेवायला. आम्ही दोघं एका ताटात जेवत नाष्टा करत होतो शेजीरी झोपत होतो. हे म्हणायचे तु कुलर लावतेस नला कफ होतो डोकं दुखतं. आम्ही त्यांना चव यावी म्हणुन भजी केली खिर केली पण रोज मी काय खातो समजत नाही गं मला कसलाच वास येत नाहिये..

#Fever #DryCough #Tastelessness #NoSmell हे Symptoms असतात हे कळलेलं पण टेस्ट करायला जाऊ आणि आयसोलेशन सेंटर मध्ये राहुन नसेल तरी करोना होईल हे वाटुन ते त्यांच्या हॉस्पिटलला गेलेच नाही. 4 दिवसाने F N ward ने कोरबा मिठागर येथे Covid Testing चा Camp भरवला हे गेले आणि 19 जणांची Symptoms बघुन टेस्ट केली. मनात भिती होतीच काय होतंय पण विश्वास असतो की आपली इम्युनिटी इतकी कमजोर नाहीये अश्या गोंधळात 2 दिवस गेले. रात्री झोपताना मी म्हटलं तुम्हाला वाटतंय का काही त्रास होतोय आतुन म्हणाले माहित नाही पण खुप झाली सुट्टी मी आता जातो कामाला पण लवकर येणार नाही घरी स्टाफ कमी आहे. तेव्हा माहित नव्हतं दुसर्या दिवशीची सकाळ खरंच इतका भयंकर दुरावा आणेल.

28 April सकाळी उठुन अंघोळिला चाललेले बाहेर बघते तर PPEकिट घातलेली 3 माणसं आमच्याच घराला Sanitize करत होते . मग दारात आले आणि कोण आहे का आवाज दिला. छोट्या पप्पांना बघुन “Amit Pawar Positive आहेत तुमच्या घरात तर घरातुन बाहेर येऊ नका कोणिच पुढची प्रोसिजर BMC वाले कॉल वर सांगतिल” हे बोलुन गेले. घर कोसळलं होतं अक्षरशः त्या क्षणी सगळे लहान मोठे रडायला लागले कळेना कोणी कोणाला धीर द्यावा. चोरासारखे हे बिचारे उठुन तैयार होऊन पैकिंग करुन एका कोपर्यात बसले.

मी जर रडले असते तर हे खचले असते लढण्या आधी हरले असते हा विचार करुन त्यांना नाष्टा दिला सगळं सामान पैक केलं. 30 तास लागले Positive पेशंटला हॉस्पिटलला शिफ्ट करायला. 29 April दुपारी Ambulance आली आणि माझ्यासाठी आयुष्य STOP झालेलं त्याच ठिकाणी. सगळे बाय करत होते मी खुप मागे होते तर मला न बाय करता हे निघुन गेले. Acworth वडाळ्याला Admit केलं आणि आपल्या सारखे Mild Symptoms व No Symptoms असणारे लोक आहेत असं म्हणाले तेव्हा धीर आला की खुप सिरियस काही नाहिये हा आजार.

त्या दिवसापासुन सतत दोन पप्पांना खुप ताप येऊ लागला मग नणंदेला मग जावांना मग Shirish dadana टेस्ट स्मेल कळणं बंद झालं. रोज BMC ला कॉल करायचो प्लिज टेस्ट करा इतरांच्यारोज आज किट नाहीत हेच ऐकायचो मग प्रायव्हेट टेस्टिंग ट्राय केलं ते सुद्धा BMC ने बंद केलेलं आमच्या हाथावर स्टँप्स होते तर आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. Facebook Live व Marathi Media channels ह्यांचा आधार घेतला तसंच 2 May ला 10th Minute ला टिम घरी आली व 7 जणांचे टेस्ट झाले.

घरात राहणं भितिदायक झालेलं कारण घरात आम्ही 17 जण होतो किती Social Distancing करणार. आम्ही 03 May ला Quarantine Centre ला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला व प्रतिक्षा नगरला मुव झालो. 1 bhk flat 5 जणांना 1 room असं विभाजन केलं. पॅकेज फुड नाष्टा व रोज डॉक्टर चेकअप सुरु झालं. 04 May ला रिपोर्ट आला 7 ही जण पॉजिटिव म्हणजेच
Ashok Kondaji Pawar
Vijay Kondaji Pawar
Ravindra Kondaji Pawar
Niranjan Vijay Pawar
Shirish Vijay Pawar
Shweta Shirish Pawar
Nehali Amit Pawar

आम्ही almost expect केलेलं हे although मी आणि निरंजन दादा completely Assymptomatic होतो पण आम्ही दोघंच Closest Contact होतो.


Ambulance यायची एकेकाला घेऊन जायची तसं तसं आपण परत एकत्र येणार का परत एकमेकांना बघणार का अशी भिती भरायची. पप्पांना इच्छाच नव्हती Admit व्हायची पण कसं तरी समजवुन 3 दिवसाने त्यांना सुद्धा admit केलं. Treatment अशी काही नसते HcQ व मल्टिविटामिन झिंक सल्फेट हाच कोर्स 5 दिवस असतो. बाकी जसा जो त्रास होईल तशी Antibiotics दिले जातात.

10 जणांना Quarantine मध्येच ठेवलं ज्यात आमचा 4 वर्षाचा Shravak Shirish Pawar हा आई वडिलांशिवाय 14 दिवस राहिला.

मोठे पप्पा 61 वर्षाचे व डायबेटिक असल्याने त्यांना त्रास जास्त झाला व Oxygen वर ठेवण्यात आलं. ही व्यक्ती आमच्या घराचा पाया आहे त्यांच्याशिवाय ह्या परिवाराचं अस्तित्वच नाहीये. आम्ही कोसळलेलो पण धिर द्यायचो पप्पा जेवा जबरदस्ती नाहीतर लिक्विड तरी खा..

आमच्या सगळ्यांच्या मागे खंबिर आधार उभा होता आमच्या 2 आत्या Ranjana Rokade आणि शोभा गडकर ज्या 2 पप्पांना Panvel वरुन डब्बा पाठवायच्या कारण पप्पांना ते जेवण गिळताच येत नसायचं. आज आम्ही सगळे जे दिवस बघतोय दोन्ही पप्पा सोबत असल्याचा तो ह्या 2 व्यक्तिंमुळेच.

7 May (बुद्ध पौणिमा) ला Amit चा रिपोर्ट Negative आला व एक एक करुन आम्ही सगळे सुखरुप घरी आलो. I know जरा जास्त Detailed झालंय पण सांगावं तितकं थोडंच आहे. सगळे तुम्हाला सल्ला देतात हे खा हे प्या ते करा पण करोना Avoid करणं तितकं सोपपं नाही. तुम्ही पॉजिटिव Attitude व विल पावर स्ट्रॉंग ठेवा Immunity वाढेल असं खात रहा आणि घाबरुन जाऊ नका आजार फार मोठा नाहिये.

Stay_Safe #Corona_Se_Daro_Na

स्वानुभव Nehali Upasham Pawar

साभार BBC मराठी

Best IT Comany In Maharashtra , Solapur