गौडगाव: गौडगाव (तालुका बार्शी )गावाचे सुपुत्र #₹विनोद चव्हाण यांनी आपल्या कामातून अमूल्य वेळ लेखणीसाठी सुद्धा दिला आहे, त्यांनी आपल्या लेखणीतून वाहतुकीची व्यवस्था, शिस्त, वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा या विषयांची मांडणी आपल्या पुस्तकातून केली आहे.
“वेळ मौल्यवान आहे तर जीवन अमूल्य आहे.”
रस्ता असला की वाहनांचे चाक येते, चाक आले की गती येते आणि गतीमुळे प्रगती होते हे विकासाचे तत्व आपण मान्य करतो पण त्याचबरोबर दरवर्षी वर्षाकाठी हजारो माणसे याच रस्त्यावर अखेरचा श्वास घेतात हे वास्तववादी आपण नाकरू शकत नाही. या पार्श्वभूमीवर गौडगाव चे सुपुत्र असलेल्या RTO विनोद चव्हाण यांनी रस्ता सुरक्षा समाजशास्त्रीय दृष्टिकोन या पुस्तकातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन उस्मानाबाद येथील ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले आहे.
शब्दांकन राहुल भड अध्यक्ष : लोकप्रतिष्ठा विचार मंच बार्शी