पुणे – येथील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
सम्राट मोझे हे अंगावर भरमसाट सोनं घालण्यासाठी प्रसिद्ध होते.

मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा सोनं घालण्याचा रेकॉर्ड सम्राट मोझे यांनी ब्रेक केल्याचीही चर्चा होती.
मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घालत होते.
गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला होता.