गर्दीत घुसून मुस्लिम युवकाचा जीव वाचवणारा कर्तव्यतत्पर गगनदीप आठवतोय का कोणाला?

0
277

गर्दीत घुसून मुस्लिम युवकाचा जीव वाचवणारा कर्तव्यतत्पर गगनदीप आठवतोय का कोणाला?

लॉकडाउनच्या काळात तीन प्रवाशांना जमावाने ठार केल्याचा पालघर जिल्ह्यातील प्रकार सकृतदर्शनी गावात दरोडेखोर आल्याच्या गैरसमजातून घडल्याचे पुढे येत असले, तरी साधू-महंतांसह त्र्यंबकेश्‍वर परिसरात मात्र हे पचनी पडायला तयार नाही. पोलिसांसह सगळे वाचतात. सुखरूप पळून जातात. फक्त महंतांसह तिघांचे जीव जातात कसे? असा संशय घेत याप्रकरणी “लॉकडाउन’ चौकशीसाठी एकटविण्याचा इशारा साधू- महंतांनी दिला आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

संचारबंदी आणि लॉकडाउन असतानाही जमाव लाठ्याकाठ्या घेऊन एका जागेवर कसा जमला, हा प्रश्‍न आहे. पोलिस असताना हत्या झाली मग पोलिस काय करत होते आणि पोलिस का मारले गेले नाहीत, ही संशयाची बाब आहे. आखाडा परिषद या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असून, लॉकडाउन संपल्यानंतर आमचे हरिद्वार येथील साधू आल्यानंतर याप्रकरणी निवेदन दिले जाईल. असे महंत स्वामी सागरानंदजी महाराज (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद)  यांनी म्हटलं आहे.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले या मध्ये पोलीस ही दिसत आहेत. साधूंना जमाव मारत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती असे लोक बोलत आहेत. त्यामुळे नैनिताल प्रकणातील मुस्लिम युवकाला गर्दीत घुसून वाचविलेला पोलिस निरीक्षक गगनदीप सिंग नक्की आठवतो. त्यासारखे धाडस याठिकाणी हजर असलेल्या पालिसांनी का दाखवले नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

हा गगनदीप सिंह आहे. नैनितालच्या एक मंदिराजवळ एका हिंदू मुलीला एक मुस्लिम युवक भेटायला आला होता. शंका धरून काही संघटनांच्या लोकांनी तिथे गर्दी करून युवकाला मारहाण करायला सुरुवात केली. त्याचे नाव कळल्यावर तर गर्दी अजून भडकली.

हा गगनदीप सिंह बेधडक त्या गर्दीत घुसला. जमावाचाआवेश पाहून घाबरून गर्भगळीत झालेला मुस्लिम पोरगा पोलिसाची वर्दी दिसताच संरक्षणासाठी त्याला येऊन बिलागला! आणि गगनदीपने हिंसक जमावाला न जुमानता मुस्लिम युवकाला सुरक्षित बाहेर काढले. जीवे मेला नसता तरी त्या मुस्लिम युवकाला गर्दीने तुडवलेच असते.

पोलिसांकडून हे वर्तन अपेक्षित आहे. पोलीस लोकांच्या संरक्षणासाठी असतात. हिंसक जमावाला घाबरून म्हाताऱ्या साधूंना गर्दीच्या हवाली करून पळ काढण्यासाठी नव्हे…

काय आहे नैनिताल ची घटना

गर्दीतून एका मुस्लीम माणसाचा जीव वाचविणारा उत्तराखंड पोलिस निरीक्षक गगनदीप सिंह त्यावेळी म्हणतो की मी फक्त माझे कर्तव्य बजावत होतो. रामनगर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून ड्युटी केलेले गगन सोशल मीडियावर हिरो झाले होते. उधमसिंह नगर येथील रहिवासी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की जमावाने या जोडप्यावर हल्ला केला तेव्हा ते गिरजा मंदिराजवळील काठावर बसले होते. नैनीताल जिल्ह्यातील रामनगर शहरापासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर गिरजा मंदिर आहे. 

ते म्हणाले, ’22 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली जेव्हा गंगा दशहरा साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात जमले होते. मी मंदिराच्या आवारात ड्यूटीवर असताना लोकांचा आवाज ऐकला आणि पाहिले की गर्दी 24 वर्षीय मुस्लिम तरुण इरफानला मंदिराच्या दिशेने आणत आहे. त्यांनी त्याला नदीकाठी मारहाण केली. नदीच्या काठा मंदिराच्या खाली 50 मीटर अंतरावर आहे. ‘

सिंह म्हणाले की, मला त्या तरूणाचा जीव धोक्यात आला आहे आणि मी लगेच गर्दीच्या दिशेने वाटचाल केली. तो म्हणाला, “मी त्या तरूणासाठी माझे शरीर ढाल म्हणून वापरले आणि मी त्याला संतापलेल्या जमावापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत होतो.”

त्याचवेळी मी महिला निरीक्षकाला मुलीला मंदिराच्या आवारातून दुसर्‍या बाजूला नेण्यास सांगितले. पुन्हा आम्ही त्यांच्यावर हल्ला करु शकणार नाही म्हणून आम्ही जोडप्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणले. सिंह म्हणाले, ‘आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली. दोघेही प्रौढ होते. मुलगा सुमारे 24 वर्षांचा होता आणि मुलगी 18 वर्षाच्या वर होती. काही काळानंतर, जेव्हा आम्हाला खात्री झाली की आम्ही संरक्षण देऊन त्यांना सोडले.

जेव्हा पोलिस खात्याने त्याला त्याच्या धाडसाबद्दल 2500 रुपयांचे बक्षीस दिले तेव्हा सिंग म्हणाले, ‘मी फक्त माझे कर्तव्य बजावत होतो. त्या व्यक्तीला इजा करण्यासाठी मी रागावलेली गर्दी मान्य करू शकली नाही. ‘

Best IT Comany In Maharashtra , Solapur