गडचिरोली इथं नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी व्हनमाने यांना वीरमरण आलं. रविवारी सकाळी भामरागड तालुक्यातील पोरायकोटी कोपरशी जंगलात पोलिसांचे क्यू आर टी पथक आणि नक्षलवादी यांची चकमक झाली. यामध्ये धनाजी व्हनमाणे यांनी चार ते पाच नक्षलींचा खात्मा केला.यावेळी नक्षलवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात धनाजी व्हनमाने हे शहिद झाले. ते मूळचे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील असून त्यांच्या विरमरणाच वृत्त येताच पुळूज गावावर शोककळा पसरली.

धनाजी व्हनमाने यांना 8 दिवसापूर्वी पोलीस महासंचालकांकडून पदक मिळालं होतं राष्ट्रपती पदकासाठी देखील त्यांचं नाव घेण्यात आलं होतं 2013 मध्ये स्पर्धा परिक्षाद्वारे ते पोलीस सेवेत दाखल झाले .
पुणे इथल्या मुंढवा इथे त्यांची पहिली पोस्टिंग होती त्या नंतर गडचिरोली इथे त्यांची बदली झाली होती नक्षलवाद्यांशी सामना करताना अनेक नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलं होत.तीन वर्षांचा इथला कार्यकाळ त्यांचा संपलेला होता मात्र लॉक डाऊन मूळ बदली होऊ शकली नाही दरम्यान रविवारी झालेल्या चकमकीत पुळूजच्या या शुरविरास वीरमरण आलं.


अतिशय गरिबीतून धनाजी व्हनमाने हे पुढे आले एक भाऊ असून तोही सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय तर आई वडील हे शेतीकडे लक्ष देतात धनाजी व्हनमाने यांचं वर्षभरापूर्वी लग्न जमलेलं होतं.

काही अवधी मिळताच लग्न समारंभ उरकला जाणार होता मात्र तत्पूर्वीच ते शाहिद झाल्यानं संपूर्ण पुळूज गाव शोकसागरात बुडालं. उमदा वीर ऐन उमेदीच्या काळात असा शाहिद झाल्यानं व्हनमाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसलळा आहे