कोरोना व्हायरस (कोविड-19)मुळे देशात गेल्या एक महिन्यापासून लागू आहे. याच दरम्यान घरात अडकून पडलेल्या चाकरमान्यासाठी खुशखबर आहे. देशातील तेल कंपनीने विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (घरगुती गॅस) किमतीत मोठी घट करण्याची घोषणा केली आहे. नवीन दरानुसार 14.2 किलो वजनाचा विना अनुदानित गॅस सिलिंडर 162.5 रुपयांनी आणि 19 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
दिल्लीत 14.2 किलो वजनाचा विना अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 744 रुपयांवरून 581.50 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये नवीन दरानुसार गॅस सिलेंडरची किंमत 579 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 584.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 569.50 रुपये किंमत झाली आहे.


तर 19 किलो वजनाचा गॅस सिलेंडर 256 रुपयांनी स्वस्त झाल्याने आता दिल्लीतील दर 1286.50 रुपयांवरून 1029.50 रुपये झाला आहे. मुंबईत 978 रुपये, चेन्नईत 1444 रुपये 50 पैसे झाला आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या महिन्यात गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.
नागरिकांना दिलासा
लॉकडाऊनमध्ये अडकल्याने इंधन आणि भाज्यांचे दर वाढत असताना सिलिंडर स्वस्त झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या आज ३८व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.