खुशखबर:ग्लेनमार्क फार्माने कोरोना उपचारासाठी लाँच केले औषध…DCGI’ची मान्यता

0
665

मुंबई, २० जून : कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी सांगितले आहे.

मुंबईतील या फार्मा कंपनीला औषध निर्मितीसाठी व बाजारपेठेत ते उपलब्ध करण्यासाठी शुक्रवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून शुक्रवारी मान्यताही देण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९ च्या रुग्णांच्या उपचारांसाठी फॅबीफ्लू फॅविपिरावीर (Favipiravir) हे औषध म्हणून वापरता येईल.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लेमार्क फार्मास्युटिल्सचे चेअरमन ग्लेन सल्दान्हा म्हणाले, ही मान्यता आम्हाला त्यावेळी मिळाली आहे जेव्हा भारतात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारताची आरोग्य व्यवस्था प्रचंड दबावाखाली आहे. फैबिफ्लू या प्रभावी औषधाच्या उपचारामुळे हा तणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पहिल्या दिवशी १८०० एमजीचे दोन डोस घ्यावे लागतील, त्यानंतर १४ दिवस ८०० एमजीचे दोन डोस घ्यावेत. ग्लेनमार्क फार्माने सांगितले आहे की, कोरोनाची सौम्य लक्षण असणारे ज्यांना मधुमेह अथवा ह्दयासंदर्भातील आजार आहे तेदेखील हे औषध घेऊ शकतात असं सांगितले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here