कौतुकास्पद : अशोक सराफ यांच्याकडून पोलिसांना आमरस पुरीचे वाटप
सुरज गायकवाड
ग्लोबल न्युज: मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सामान्य नागरिकांसह आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीसांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज मुंबईच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी अशोक व निवेदिता सराफ यांनी त्यांना मेजवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आमरस पुरीचे जेवण देणार आहेत. विशेष, म्हणजे निवेदिता सराफ यांनी स्वतःच्या हातानं आमरस पुरी तयार करणार आहेत.


पोलिसांकडून परवानगी मिळाल्यावर त्यांनी हा बेत तयार करत स्वतः निवेदता सराफ पोलिस ठाण्यात आमरस पुरी घेऊन आल्या होत्या. सध्याच्या या कठीण परिस्थितीत तुम्ही जे कार्य करत आहात तै कौतुकास्पद आहे. तुमच्याबद्दल मनात कायम आदर आहे आणि तसाच राहिल अशा शब्दांत सराफ दाम्पत्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. सोशल मिडियावर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मुंबई पोलिसांसाठी दाखवलेल्या या प्रेमाचं भरभरुन कौतुक होतंय.

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत सरकारनं लॉकडाऊनच्या कालावधीत ३१मेपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळं पुन्हा पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे.