कोवळ्या मनाची संवेदनशीलता भारावून टाकणारी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
333

कोवळ्या मनाची संवेदनशीलता भारावून टाकणारी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्युज: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील सगळे नागरिक सहभागी होत असतांना राज्यातील बालयोद्धेही मागे नाहीत. कुणी वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहे तर कुणी शिष्यवृत्तीची. निरागस बालपण अनुभवणारी ही मुले जेंव्हा सामाजिक दायित्वापोटी सजग होतात आणि मदतीचा हात पुढे करतात तेंव्हा त्यांच्यातील ही संवेदनशीलता पाहून मन भारावून जाते आणि  कोरोनाविरुद्धच्या लढाईला आपल्याला अधिक बळ मिळते असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणाऱ्या शौर्य, कस्तुरी, श्रेयस, अंश यांच्यासह मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणाऱ्या  अंकितला धन्यवाद दिले आहेत. वाढदिवसाच्यानिमित्ताने  शुभाशिर्वाद दिले आहेत.

मीराभाईंदरच्या कस्तुरी सचिन बोंबले पाटील या मुलीने ५५५, सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील तारले गावच्या शौर्य राठी नावाच्या बालकाने ५०१,  बारामतीच्या अंश संदीप गायकवाड यांने ५००० रुपये,  इंदापूरच्या श्रेयस सुनील जगताप याने  १००० रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. पुण्याच्या अंकीत मनोज नाईकने आपली मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची १६३० रुपयांची रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.

कोवळ्या मनाची ही बालके आपल्या मजबूत भारताचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांची मदत खुप अमुल्य आहे. अशी सुसंस्कृत आणि समाजहिताची जाण असणारी पिढी आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 331 कोटी रुपये
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत ३३१.७० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. ज्यांना या आपत्तीच्या काळात मदत देऊन कोविड विषाणुविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती खालीलप्रमाणे आहे. या खात्यात  सढळ हाताने रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch, 
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

Best IT Comany In Maharashtra , Solapur